पुणे
श्रमिक पत्रकार म्हणजे वर्तमानपत्राच्या गळेकापु स्पर्धेत स्वत:ला सदैव
सज्ज ठेवत समाजाची हीताची पत्रकारिता करणारा पत्रकार ! पुणे श्रमिक पत्रकार
अशीच भुमीका यथाशक्ती यथामती सतत पार पाडीत असतात.त्यासाठी त्यांनी कधीही
कोणत्याही लोभाची अपेक्षा ठेवली नाही.कुणाचीही मुलाहीजा न ठेवल्याने उलट
बिल्डरलॉबी,सर्वच राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते यांची त्यांनी नाराजी ओढवुन
घेतली आहे.वर्तमानपत्रांना मिळायच्या त्या जाहीराती मिळत गेल्या.पण
पत्रकारांचा गृहप्रकल्प टांगता आजवर कुणी ठेवला आहे?पत्रकारांना घर मिळायची
शेवटची आशा होती ती आताही धुळीला मिळाल्याची वंदता आहे.या जागेवर सरकारी
संस्थेने हक्क बजाविला आहे.सत्य कोणालाच नकोय का?समाजात तळागाळाची समस्या
मांडणारा पत्रकार आपली कुठेच समस्या मांडु शकत नाही .यात सामान्य
पत्रकारांना कुणी घर देता का घर अशी म्हणायची वेळ आली आहे.सत्य मांडलय याची किंमत पत्रकार भोगत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव काय?
- एक वार्ताहर