हवाई सफरवरून दिव्य मराठी - लोकमतमध्ये युध्द पेटले

जळगाव - जळगावांत दिव्य मराठी आणि लोकमतमध्ये साप - मुंगूसाचे नाते आहे.गेल्या एक वर्षापासून उभयतांत शह - काटशहाचे राजकारण चालू आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिव्य मराठी आणि लोकमतमध्ये हवाई सफरवरून चांगलेच युध्द पेटले आहे.
जळगावात लवकरच सिल्व्हर जुबिली कंपनीच्या  वतीने विमान सुरू होणार आहे. त्यासाठी पाहणी करण्यासाठी कंपनीचे एक हेलिकॉप्टर काही दिवसांपुर्वी जळगावांत आले होते. आता हेलिकॉप्टरच आले म्हटल्यानंतर, त्याचे जणू भाडे वसूल करण्यासाठी कंपनीने एक फंडा वापरला. या हेलिकॉप्टरमधून 8 मिनिटांची जळगाव हवाई सफर केवळ 2700 रूपये ठेवली.श्रीमंत बापाच्या पोरांना हौस पुर्ण करण्यासाठी नामी संधी मिळाली.अनेकांनी मस्त एन्जॉय केला.

असो, ही सफर वृत्तपत्रांच्या संपादकांसाठी मात्र मोफत होती.मात्र सकाळ आणि लोकमतचे संपादकांनी त्याचा लाभ घेतला नाही.मात्र दिव्य मराठीचे निवासी संपादक, सरव्यवस्थापक,चिफ रिपोर्टर, आणखी दोन रिपोर्टर आणि दोन प्रेस फोटोग्राफर असे आठ- दहाजण बायकोसह हवाई सफर केली.हवाई सफर करताना वरून जळगाव शहराची मस्त छायाचित्रे टिपली.ही छायाचित्रे दिव्य मराठीत दि.23 नोव्हेंबर रोजी दिव्य सिटीत प्रसिध्द झाली. दिव्य मराठीने दिवे लावताच लोकमतचे इंडिकिटर लागले. ऋषीबाबूपर्यंत वार्ता गेली.ऋषीबाबूनी फैलावर घेतले,मग काय लोकमतने उलट्या बातम्या देणे सुरू केले आहे .लोकमतने 24 नोव्हेंबर रोजी हवाई सफरीत नियम धाब्यावर म्हणून लोकमत स्पेशल वार्ता दिली आहे.
दिव्य मराठीच्या संपादकांनी ऐकटे जायला हवे होते, मात्र सोबत अनेकांना नेले. ही चूक आहे.मात्र लोकमतला दिव्य मराठीची हवाई सफर रूचली नाही,हेही सत्य आहे.आता कोण बरोबर आणि कोण चूक,हे वाचक आणि चौकशी अधिकारी ठरवतील.मात्र हवाई सफरवरून पुन्हा एकदा दिव्य मराठी आणि लोकमतमध्ये युध्द पेटले आहे,हे नक्की...


दोन्ही पेपरमधील बातम्या वाचा 
 

दिव्य मराठी
लोकमत