दिव्य मराठीची कासवगती...

औरंगाबाद - एका बाजूला उशिरा का होईना महाराष्ट्र टाइम्सने महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्या इडिशन सुरू केल्या असताना, प्रिंट मीडियात वादळ निर्माण करणा-या दिव्य मराठीची वाटचाल कासवगतीने चालू आहे. ससाच्या वेगाने धावणा-या भोपाळशेठची वाटचाल अचानक कासव गतीने सुरू का झाली,याचे कोडे तमाम बोरूबहाद्दरांना पडले आहे.

मार्च २०११ मध्ये भोपाळशेठने औरंगाबादेत पाऊल ठेवले आणि महाराष्ट्राच्या प्रिंट मीडियात मोठे वादळ निर्माण झाले.प्रस्तापित म्हणणारे लोकमत,सकाळ ग्रुपसुध्दा हादरला.लोकमत,विशेषत: सकाळची अनेक माणसे फोडून, भोपाळशेठने हादरा दिला.औरंगाबाद पाठोपाठ नाशिक, जळगाव,नगर नंतर सोलापूर इडिशन सुरू झाली.मात्र औरंगाबादला दीड वर्षापुर्वी प्रथम आवृत्ती सुरू झालेली अजनूही मराठवाड्यातील चार जिल्ह्यात पोहचलेली नाही.नांदेड, लातूर,परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यात अजूनही दिव्य मराठीचे दिवे लागलेले नाहीत.नगर आवृत्ती सुरू होवून एक वर्षे झाले तरी, नगर जिल्ह्यात अजूनही अंक पोहचलेला नाही.
अकोला इडिशनचा सव्र्हे झालेला असला तरी प्रत्यक्षात अजूनही इडिशन सुरू झालेली नाही.कोल्हापूरची नुसतीच हवा चालू आहे.दिव्य मराठीच्या अगोदर महाराष्ट्र टाइम्सने आपले पाय रोवले आहेत.पाठोपाठ डॉ.रावसाहेब मगदूम यांच्या व्हिजन वार्तानेही चांगलीच हवा निर्माण केली आहे. त्यामुळे दिव्य मराठीची चांगलीच कोंडी निर्माण झाली आहे.
दिव्य मराठीची औरंगाबाद इडिशन चांगली चालू असली तरी, नाशिक, जळगाव आणि सोलापूर इडिशन म्हणाव्या तशा झेप घेतलेल्या नाहीत.त्यामुळे भोपाळशेठ रूष्ठ झाल्याचे कळते.त्यामुळे स्टेट इडिटर अभिलाष खांडेकर हतबल झाल्याचे समजते.