पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचे काम 'बेरक्या'ने केले- एस.एम.देशमुख

अहमदनगर - पत्रकारितेत चालू असलेल्या अपप्रवृत्तीवर घाला घालण्याचे आणि पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचे काम बेरक्याने केले, त्यामुळे 'बेरक्या' पत्रकारांचा ख-या अर्थाने 'पाठीराखा' ठरला आहे,असे गौरवोद्गार पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी येथे व्यक्त केले.
अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने रविवारी सायंकाळी दर्पण तथा मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस.एम.देशमुख बोलत होते.यावेळी पालकमंत्री बबनराव पाचपुते, अर्थतज्ज्ञ मुकुंद घैसास,पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे,वात्रटिकाकार विलास फुटाणे,प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, पुर्वी पत्रकारितेतील घडामोडी कळण्याचे माध्यम नव्हते, मात्र बेरक्या ब्लॉगमुळे ते कळू लागल्या आहेत. पत्रकारांच्या हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही पत्रकारांवर अन्याय झाला तर बेरक्या ठामपणे त्यांच्यापाठीमागे उभा राहतो. त्याने कधी कोणता पत्रकार आणि कोणता पेपर आहे,याचा विचार केलेला नाही.वृत्तपत्र व्यवस्थापनाविरूध्द अत्यंत निडरपणे त्यांनी बातम्या दिल्या.बेरक्यामुळेच पत्रकारितेतील अपप्रवृत्तीला आळा बसला आहे.
अनेकजण समजतात,मी बेरक्या आहे,मात्र बेरक्या मी नाही, बेरक्या कोण आहे,हे मला माहित नाही,मात्र माझ्या चळवळीला बळ देण्याचे काम बेरक्याने केले, बेरक्यामुळे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला ख-या अर्थाने व्यासपीठ मिळाले.
देशमुख आणखी म्हणाले की,महाराष्ट्रात पत्रकारांवर राजकीय नेते आणि पोलीस प्रशासनाकडून सातत्याने हल्ले होत आहेत.त्यामुळे पत्रकारांना संरक्षण मिळावे, त्यासाठी कायदा व्हावा म्हणून आपण लढा सुरू केला आहे. हा लढा आता कायदा झाल्याशिवाय थांबणार नाही.राजकीय नेते कायदा होवू नये म्हणून प्रयत्नशील आहेत,तर शासन पत्रकारांच्या बाबतीत उदासिन असून, या सरकारला वठणीवर आणण्यासाठी पत्रकारांनी एकसंघ होण्याची गरज आहे, 
यासंदर्भात अधिक बातमी आजच्या देशदूतमध्ये वाचा...
देशदूत