माध्यमांपेक्षा राजकारणी प्रामाणिक - पी. साईनाथ

निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा पेङ न्यूजचा मामला चर्चेत येऊ लागला आहे. ही चर्चा दबक्या आवाजात होत असली तरी हळूहळू या चर्चेचा वेग वाढणार आहे आणि ऐन निवङणुकीच्या दरम्यान पुन्हा एकदा माध्यमांतील लेखणीबहाद्दरांना राजकारण्यांच्या दारात पेड न्यूजची भीक मागावी लागणार आहे. पेड न्यूजमुळे किती फायदा होतो आणि किती नाही, हे अलहिदा....परंतु किमान या पेड न्यूजच्या पॅकेजमुळे वाईट बातमी तरी वर्तमानपत्रात छापून येत नसल्याने नको ती कटकट म्हणून राजकारणी माध्यमांसमोर पेडन्यूजचा तुकडा टाकतात आणि लायकी नसणाऱ्या वर्तमानपत्रांचीही चांदी होते....यासंदर्भात हिंदू या दैनिकात नुकताच पी. साईनाथ यांनी एक लेख लिहिला असून यामध्ये माध्यमांपेक्षा राजकारणी प्रामाणिक असल्याचा कयास त्यांनी काढला आहे. राजकारणी लोक किमान पेड न्यूज दिली असल्याचे जाहीरपणे कबूल करीत असतात परंतु माध्यमे मात्र पेड न्यूज घेऊनही यासंदर्भात कानावर हात ठेवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.