कुंभमेळ्यासाठी आकाशवाणीची खास प्रसारण सेवा

कुंभेमेळा हा तमाम भारतीयांच्या जिव्हाळ्याचा आणि श्रध्देचा विषय आहे. याचा आखोंदेखा हाल संपूर्ण दशवासियांना देण्यासाठी माध्यमांची चढाओढ लागली आहे. यात आकाशवाणीसारखे सरकारी माध्यमही आता मागे राहिलेले नाही. आकाशवाणीने यासाठी खास कुंभवाणी चॅनलची सुरूवात केली असून दिवसभरात 16 तास या चॅनलवरून प्रसारण करण्यात येणार आहे. 103.1 एफएम बॅंड वरून हे प्रसारण संपूर्ण देशभरात ऐकता येणार असून 25 फेब्रुवारीपर्यंत हे प्रसारण सुरू राहणार आहे. कुंभमेळ्यातील घडामोडींचे प्रसारण तर या चॅनलवरून करण्यात येणारच आहे, परंतु त्याचबरोबर वसंत पंचमी स्नान, आमवस्या पर्व आदींचे थेट प्रसारणही करण्यात येणार आहे. टीव्हीशी स्पर्धा करताना भलेही आकाशवाणीची दमछाक होत असली तरी या माध्यमाची विश्वासहर्तता आणि श्रोत्यांचा विश्वास यावर आजही आकाशवाणीची सेवा टिकून आहे.