नागपूर 'मानबिंदू'मध्ये खो-खो चा खेळ

नागपूर - 'महाराष्ट्राचा मानबिंदू'मधील शहर विभागात काही महिन्यापासून वातावरण ‘ढवळून' निघाल्याने येथे कर्मचारी टिकत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, एक गेला की दुसरा आला असा खो-खोचा खेळ सुरू आहे. त्यामुळे दर महिन्याला उपसंपादक/वार्ताहरांची भरती करावी लागत आहे.
साहेबांना ‘जान' म्हणाणारेही येथे दोन ते तीन महिन्यात त्रस्त झाले. त्यामुळेच सहाच महिन्यात पाच उपसंपादकांनी पर्र्याय शोधला आहे. ‘साहेबां'ना बडव्याप्रमाणे दोघांनी घेरले आहे. त्यामुळे इतर उपसंपादक/वार्ताहर यांचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. येथे ‘खडे'सुद्धा असल्याने अद्याप ‘बालाजी'च्या प्रतिभेचे ‘देव' दर्शन झाले नाही. एकूणच काय तर साहेबांनी घेतलेल्या कुठल्याही नवीन माणसाला कसे फेल पाडायचे आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी त्याला कसे पिटाळून लावायचे ही कला या बडव्यांना चांगलीच जमली आहे; पण यामुळे ‘साहेबां'पासून जिव्हाळ्याची माणसे तुटत आहेत. या बडव्यामुळे सध्या सगळेच त्रस्त आहेत. आपल्या शिवाय पेपरच छापून येत नाही असा समज त्यांनी साहेबांच्या मनात पसरविला आहे. ज्यांच्या लेखणीने एकेकाळी नागपूर पासून ते दिल्लीपर्यंत प्रशासनाची ‘बोबडी' वळत होती. तेही आता ‘एक्स्प्रेस'मधून उतरल्याने आणि मानबिंदूत अडकल्याने सहन करत गप्प आहेत. कधी ना कधी आपल्याला ही ‘मदतीचा हात' मिळेल. या आशेने सगळेच ससक्त पर्यायाची वाट पाहात आहेत.असे असतानाही साहेब त्यांची ‘जान'च आहेत. आपल्या 'गजानाना'वरील भक्तीमुळे ते त्यांच्या एका शब्दावर झोकून देऊन काम करायला तयार आहेत; मात्र त्यांच्या मधात बडवे उभे आहेत.