पूर्णा - येथील पत्रकार दिनेश चौधरी यांच्यावरील ऍसिड हल्ला प्रकरणाची दखल
राष्ट्रीय पातळीवरील "प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया'ने घेतली असून शुक्रवारी
(ता.15) या समितीचे अनिल अग्रवाल यांनी पूर्णा येथे श्री. चौधरी व
त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
या घटनेच्या चौकशीसाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने एक सदस्यीय समिती स्थापन केली असून घटनेच्या सखोल चौकशीसाठी सदस्य अनिल अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. अग्रवाल यांच्या समवेत दैनिक "हिंदुस्थान'चे संपादक उल्हास मराठे, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वांभर गावंडे आदींनी श्री. चौधरी यांची त्यांच्या घरी भेट दिली. घरी श्री. अग्रवाल यांनी चौधरी यांच्याशी चर्चा व विचारपूस केली. या संबंधीची माहितीची नोंद करून तीन दिवसांत या प्रकरणाचा अहवाल प्रेस कौन्सिलकडे आपण सादर करू, असेही ते या वेळी म्हणाले.
पूर्णा पोलिस प्रशासनाने या प्रकरणी काय कायदेशीर कार्यवाही केली, याबाबतचा आढावा त्यांनी या वेळी घेतला. पोलिस अधीक्षक संदीप पाटील व स्थानिक तपास अधिकाऱ्यांनी चर्चा केली. या वेळी त्यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कार्यवाही बाबतचे निर्देश दिले.
स्थानिक पत्रकारांशी संवाद साधून श्री. अग्रवाल यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"मुख्यमंत्र्यांशी केली न्या. काटजूंनी चर्चा'
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्यायमूर्ती काटजू यांनी या प्रकरणाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यांना चौकशी समितीबाबत माहिती दिली असून पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया संबंधितांना निर्देशही देईल, अशी ग्वाही अनिल अग्रवाल यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.
साभार : ई - सकाळ