कर्जत, (जि. नगर) -
पत्रकार गणेश प्रल्हाद चौभे याच्यासह सुभाष कुंडलिक चौभे, अंबादास यशवंत
साठे (सर्व रा.बाबुर्डी बेंद, ता.नगर,जि.नगर) व सतीष रूपचंद मुळे
(रा.मुळेवाडी,ता.कर्जत) यांना एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची
शिक्षा देण्यात आली. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एन. पाटील यांनी
ही शिक्षा सुनावली आहे. गणेश हा माजी ,दिव्य, पत्रकार असून काही
दिवसांपूर्वीच त्याने राजीनामा दिला आहे. एकतर्फी प्रेमातून एका मुलीचे
लग्न मोडण्यासाठी तो साथिदारांना घेऊन गेला होता. तेव्हा ग्रामस्थांनी
त्यांना चोप दिला व पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
याबाबतची हकीकत अशी, 16 मार्च 2010 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास यातील प्रमुख आरोपी गणेशसह वरील साथीदारांनी कापरेवाडी (ता.कर्जत) येथे एका घरी जाऊन त्यांच्या मुलाचे लग्न मोडण्यासाठी धुमाकूळ घातला होता. ज्या दिवशी दुपारी आळंदी येथे हे लग्न होणार होते, त्याच दिवशी पहाटे हा प्रकार झाला. आरोपी गणेश याला या लग्नातील नियोजीत वधूबरोबर लग्न करायचे होते. या मुलीवरील एकतर्फी प्रेमातून मुलाच्या (नियोजीत वर) घरी जाऊन त्याच्या विधवा आईला धमकावले. तुझ्या मुलाचे लग्न या मुलीशी लावू नकोस. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. असे म्हणत त्याने धमकावले होते. तर स्वतः पत्रकार असून नगरच्या मोठमोठ्या नेत्यांशी आपले जवळचे संबंध असल्याचे तो प्रभावटाकण्यासाठी त्यावेळी सांगत होता. ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात खटला दाखला केला. नुकताच या खटल्यायाचा निकाल लागला. निकाल ऐकून यातील मुख्य आरोपी गणेश रडू कोसळले.य़ा खटल्यात सरकारपक्षातर्फे संदीप नागरगोजे यांनी कामकाज पाहिले. गणेश याचे शिक्षक पत्रकारांना काम करण्यास बंदी करावी, या मागणीची याचिका आैरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याची सुनावणी सुरू असतानाच त्याच्याविरूद्ध दाखल जुन्या गुन्ह्याचा निकाल लागला आहे. शिक्षक पत्रकारांनीच त्याच्या वृत्तपत्राच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्याने त्याला वृत्तपत्र सोडावे लागल्याचे सांगण्यात येते.