कोल्हापूर -
सुरेश पवार ऐककाळी पुढारीचे समूह कार्यकारी संपादक होते.तीन वर्षापुर्वी
पद्मश्रीबरोबर खटके उडाल्यानंतर ते पुण्यनगरीत गेले. पद्मश्रींने मग दिलीप
लोंढे यांना कार्यकारी संपादक म्हणून घेतले आणि त्यांचे नाव प्रेसलाईनमध्ये
येवू लागले. तिकडे पुण्यनगरीत गेलेले सुरेश पवार सहा महिन्यातच कंटाळले
आणि पद्मश्रींच्या हातापाया पडून पुन्हा पुढारीत परत आले.मात्र त्यांची
जागा दिलीप लोंढेंनी घेतल्यामुळे त्यांची
गोची झाली.तेही कार्यकारी संपादक अलिखित होते,मात्र प्रेसलाईनमध्ये स्वत:चे
नाव यावे यासाठी ते उताविळ होते.अखेर त्यांची बोळवण करण्यासाठी
पद्मश्रींनी त्यांचे नाव निवासी संपादक म्हणून देण्याचे ठरविले आहे.
सुरेश पवार यांचे नाव उद्यापासून निवसी संपादक म्हणून पुढारीच्या प्रेसलाईन
येईल. हा त्यांचा सन्मान आहे की, बोळवण हे तुम्हीच ठरवा.मात्र ते फौजदारचा
कॉन्स्टेबल झाले हे मात्र नक्की