'बेरक्या' ब्लॉगला दोन वर्षे पुर्ण...

औरंगाबाद - पत्रकारांचा पाठीराखा म्हणून परिचित असलेल्या बेरक्या ब्लॉगला दोन वर्षे पुर्ण झाली. बेरक्या भविष्यातही सुरूच राहणार आहे.कोणतीही बातमी दबणार नाही किंवा दबली जाणार नाही,असा शब्द बेरक्याने दिला होता,आणि तो तंतोतंत पाळलेला आहे.
दोन वर्षापुर्वी बातमीदार नावाचा ब्लॉग सुरू होता.या ब्लॉगला मराठवाड्यातील बातम्या पुरविण्याचे काम बेरक्याने केले.नंतर २१ मार्च २०११ रोजी बातमीदारचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बेरक्याने स्वतंत्र ब्लॉग सुरू केला.त्याच्या अगोदर बोरूबहाद्दर सुरू झाला होता. बातमीदार,बोरूबहाद्दर आणि बेरक्याने महाराष्ट्रातील मीडियात आपला दबदबा निर्माण केला होता,मात्र बातमीदार आणि बोरूबहाद्दर ब्लॉग एकापाठोपाठ बंद पडल्याने बेरक्या एकटा पडला होता.मात्र बातमीदार आणि बोरूबहाद्दराने ब्लॉग जरी बंद केला तरी बेरक्यास मदत केल्याने बेरक्याने हे शिवधनुष्य अजूनही उचलून धरले आहे.
बेरक्याने पत्रकारांवर होणारा अन्याय,त्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले.ते मांडत असताना समोरचा कोण आहे,याचा विचार कधी केला नाही.त्यामुळे सकाळ,लोकमत,दिव्य मराठी,महाराष्ट्र टाइम्य,देशोन्नती,पुढारी आदी वृत्तपत्रातील बातम्या निर्भिडपणे प्रसिध्द झाल्या.आय.बी.एन-लोकमत,झी २४ तास या चॅनलमधील बातम्याही बेरक्याने दिल्या.
बातम्याबरोबर पत्रकारांना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांचे कौतुक करण्याचे काम बेरक्याने केले.एस.एम.देशमुख हे पत्रकारांच्या प्रश्नासाठी लढत आहेत,त्यांच्या चळवळीला बळ देण्याचे काम बेरक्याने केले.
हा ब्लॉग चालवित असताना,अनेक अडथळे आले.बेरक्या कोण आहे, हे शोधण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात आली.मात्र दोन वर्षे झाली तरी बेरक्या नेमका कोण आहे,हे अजूनही सिध्द झालेले नाही.कोणीही कोणाचेही नाव घेतात,मात्र बेरक्या हा एकटा नसून,हे अनेकांचे टीमवर्क आहे.
बेरक्याने दोन वर्षात आठ लाख हिटस्चा टप्पा पार केलेला आहे. हे केवळ पत्रकारांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळेच घडले.अनेकजण उघडपणे बोलू शकत नाहीत,मात्र त्यांचा आतून बेरक्याला पाठींबाच आहे.
सर्वांचे आभार. बेरक्या ब्लॉगला दोन वर्षे पुर्ण झाली आहेत.बेरक्या ब्लॉग असेच कोणाचाही मुलाहिजा न ठेवता चालूच राहणार...
आम्ही कोणत्याही एका पत्रकाराविरूध्द आणि वृत्तपत्र मालकांच्या विरोधात नाहीत. त्यांच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत.

जाता - जाता : बेरक्या बंद पडला, बेरक्या बंद पडणार, अशी अफवा नेहमी पसराविणाऱ्यांची तोंडे बंद झाली का ? त्यांच्या नाकावर टिच्चून बेरक्या सुरू आहे, सुरूच राहणार.पत्रकारितेत राहून पत्रकारांवर अन्याय किंवा पिळवणूक करणाऱ्यांना बेरक्या सोडणार नाही. त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास बेरक्या तयार आहे.