( स्थळ : सानपाड्यातील एका बिअर बार शेजारील पानाची टपरी )
पेंद्या - राम, राम साहेब, भर दुपारीच इकडं...
रंगिला - जावू दे... मरू दे... कितीही काम केलं तरी जोडेच...
पेंद्या - परवा तर जोडे खाता - खाता वाचला व्हता, अजून कोण मारले जोडे ?
रंगिला - अरे तसे नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, काम करूनही बोलणी खावी लागतात...
पेंद्या - असं व्हय...पद्मश्रींची भाषा शिकलो म्हणा की...पद्श्री सारखं म्हणत असतात, जोड्याने मारू का,मला वाटले बसले की काय...
रंगिला - नाही अजून बसले...पण परवा थोडा हुकलो आणि लगेच माफीनामा लिहून दिला..सॉरी,सॉरी असे खूपदा म्हटले,तेव्हा कुठे त्यांनी ठिक आहे म्हटले...
पेंद्या - हुकलो की झुकलो ? पण जावू द्या,त्याचं म्हणावर नका घेवू ... करतील तुम्हाला क्षमा...जसं मागं शाळगावकरला चारदा माफ केलं व्हतं...
रंगिला - ते सगळं खरं आहे,पण मला नाही वाटत,आता मी जास्त दिवस राहीन...
पेंद्या - साहेब,शुभ बोला,तुम्हाला जगावंच लागेल, किमान देखणेसाठी तरी...
रंगिला - अरे बाबा,हळू बोल, पद्मश्रींची माणसे माझ्यावर पाळत ठेवून आहेत...
पेंद्या - बरं,बरं हळूच बोलतो, मग काय म्हणतात, आपले देखणे...
रंगिला - अरे बाबा, तो विषय इथं काढू नको, त्याच्यामुळेच माझी बदनामी होतीया....
पेंद्या - अवं साहेब, बाकीचे काय धुतल्या तांदळासारखे आहेत का...तुमचा तो ब्युरो, परवा आपल्या घरी घेवून गेला होता...
रंगिला - (आश्चर्याने ) काय, काय...काय केले ब्युरोने?
पेंद्या - जावू द्या, इषय लई नाजूक हाय...तो आयुष्यातून उठायचा...
रंगिला - अरे बाबा सांग, वाटल्यास थर्टी पाजवितो...
पेंद्या - च्या मारी, थर्टीसाठी,थर्ड डिग्री वापरता म्हणा की...
रंगिला - बरं तसंच सांग, नंतर मोठी पार्टी देतो...
पेंद्या - साहेब, फुकटच्या पाट्र्या मी नाही करीत, जसं तुम्ही आणि पिंपळपाननं केलं...
रंगिला - अरे आम्ही कधी केली, फुकटची पार्टी...
पेंद्या - पंधरा दिसापुर्वी प्रेस क्लबमध्ये तुम्ही आणि पिंपळ पानने भर दुपारीच फुकटर्ची पार्टी केली आणि तसेच ऑफीसमध्ये आलाव म्हण..त्यावरून पद्मश्रीं जाम चिडले आणि तुमची खरडपट्टी केली ...
रंगिला - अरे बाबा, तसेच आलो पण काम व्यवस्थितच केलं ना...
पेंद्या - एवढंच नाय तर पेड न्यूज ढापल्या म्हणूनही बोंबाबोंब उठलिया...
रंगिला - हा माझ्यावर खोटा आरोप आहे, कोणीतरी माझ्यावर षडयंत्र रचतयं...
पेंद्या - असं व्हय, खरं,खोटंं तुम्हालाच माहित...बरं ते जावू द्या, काय झालं तुमचं स्मार्ट मित्रच....
रंगिला - अरं तिथं पण, माझ्यावर षडयंत्र करण्यात आलं, माझे काम होता होता हातचे गेले...
पेंद्या - साहेब, यावर एक उपाय सांगू काय ...तुम्ही इकडं यायचं सोडा, देखणे - फिकणे सोडा,तुम्ही फक्त कामाशी गाठ घाला...मग बघा तुम्हाला कसे चांगले दिवस येतील.तुमच्यात खूप टालेंट हाय,तुमच्यासारखं पेज ले-आऊट कोणीच करू शकत नाही...पण हे सगळे सोडा...
रंगिला- अरे बाबा, हा सल्ला देणारा तू एकटाच उरला होतास...अरे माणसांचा जन्म पुन्हा - पुन्हा मिळत नसतो, माणसांनी खावून - पिऊन सगळी ऐश्य करावी...
पेंद्या - मग करा ऐश्य आणि खावा जोडे, येतो मी....यालाच म्हणतात, पालथ्या घडावर पाणी....