लातूरच्या पत्रकार संघात परिवर्तन...

लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत पांडोबा-दगडोबाचा पराभव होणार... असे भाकीत आम्ही व्यक्त केले. हे भाकीत प्रसिध्द होताच पांडोबाने रणांगणातून पळ काढला.त्यानंतर दगडोबा नावात जय असूनही पराजय मान्य केला.त्यामुळे परिवर्तन पॅनलचे अशोक चिंचोले आणि विजय स्वामी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला होता.
लातूर जिल्हा पत्रकार संघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे अशोक चिंचोले आणि विजय स्वामी विजयी झाले. मागच्या १३ वर्षांपासून या संघाची निवडणूक बिनविरोध होत होती. यंदा पहिल्यांदा राजकारण विरहित निवडणूक झाली यात अध्यक्षपदाचे उमेदवार अशोक चिंचोले आणि सरचिटणीसपदाचे दावेदार विजयकुमार स्वामी विजयी झाले.
अशोक चिंचोले यांना १३६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी विकास गाढवे यांना १०० मते पडली. सरचिटणीसपदाचे उमेदवार विजय स्वामी यांना १७३ तर त्यांचे प्रतिस्पर्धी नरसिंग घोणे यांना ५४ मते पडली. अशोक चिंचोले आणि विजय स्वामी बहुमताने विजयी झाले आहे. पांडोबा निवडणुकीत तटस्थ राहिले तर दगडोबांनी परिवर्तनच्या विरोधात प्रचार केला.
लातूरच्या पत्रकार संघात आता खऱ्या अर्थाने परिवर्तन झाले आहे.पांडोबा आणि दगडोबाची बजबजपुरी आता संपली आहे. सर्व परिवर्तन मित्रांना बेरक्याच्या शुभेच्छा...