* नांदेड - एका बातमीवरून मानबिंदूच्या दोन
ज्येष्ठ आणि शहाण्या उपसंपादकांमध्ये गुरुवारी कार्यालयातच कडाक्याचे भांडण
झाले. हाणामारीसुद्धा होणार होती; पण ‘धर्म'चा धाक असल्याने साहेबांचाच
‘राज' चालला. तरीही ‘भास्कर' तळपलेला होता. म्हणे अशा भिकार सहका-यांवर
‘सु' करून मागचे पुढचे ‘नील' करेल. त्यामुळे ‘धर्म' संकटात सापडला आहे.
* नांदेड - मानबिंदूच्या जाहिरात विभागात काम
करणारी मुलगी प्रियकारासोबत पळून गेली. गेली तर चांगलच आहे; पण सोबत तिने
वसुलीचे ४० हजार रुपयेसुद्धा नेले. शेटजीकडून अशा पद्धतीने पगार व्याजासगट
वसूल केला. याची सध्या मानबिंदूसह नांदेडच्या पत्रकारांमध्ये चांगलीच चर्चा
आहे.
असो, मियॉ बिबी राजी तो...
* अकोला - संपादकीय विभागाच्या मीटिंगमध्ये
प्रेमदास यांनी स्वतःचेच स्वतः कौतुक करून घेतले. ते म्हणाले, ‘मी आता
पीटीआयच्याही पुढे गेलो. पीटीआयअगोदर माझ्याकडे बातमी होती. लोकांना काय.
काहीपण बोलतात'.
****************************
- याला म्हणतात वराती मागून घोडे नाचती नाकतोडे
................................................................
* मुंबईच्या आमच्या एका मित्राचे म्हणणे...
- रंगिला औरंगाबादीची स्मार्ट मित्रच्या संपादकपदी निवड होणार होती, पण बेरक्यामुळे गेली...
+ आता हे म्हणणे माझ्या बुध्दीला पटत नाही...
..................................................................
* सगळ्यांच्या नजरा डीएमकडे
अकोला - अकोल्यामध्ये डीएम येणार हे निश्चित झाल्याने लोकमत, देशोन्नती या
आघाडीच्या दैनिकातील अनेक जण औरंगाबादला जावून आपला रिझुम देऊन आले.
--------------------------------------------------------------------------------
मुंबई - म.टा.चे संपादक अशोक पानवलकर यांचे आसन डगमळीत तर पुण्याचे पराग करंदीकर यांचे आसन बळकट...करंदीकडे पुणे, कोल्हापूर, नाशिक,औरंगाबाद आणि नागपूरची जबाबदारी...पानवलकर यांची लवकरच विकेट...रिझल्ट झिरोमुळे पानवलकरांवर संकट..रंगिला औरंगाबादीचे जोरदार प्रयत्न...पण बेरक्याच्या पोलखोलमुळे संधीवर संक्रांत...
......................................
नागपूर - सकाळच्या एमआयडीसी ऑफीससाठी मुख्य उपसंपादक हवा असल्याची जाहिरात
काही दिवसांअगोदर झळकली. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या उपसंपादकामध्ये
नाराजीचा सुर आहे. अनेक जण विदर्भ सकाळच्या पहिल्या दिवसांपासून कार्यरत
आहेत; पण ते उपसंपादकच आहेत. त्यामुळे आपल्याला बढती का नाही, असा प्रश्न
विचारात त्यांच्यात असंतोष आहे. तर बाहेरच्या दैनिकातून येणा-या
उपसंपादकाला थेट मुख्य उपसंपादक म्हणून घेणार या विषयीसुद्धा रोष आहे.