"पालिकेमधील महिला पत्रकाराचे प्रताप" या मथळ्याची
बातमी बेरक्यावर प्रसिद्ध होताच आता पर्यंत तोंडावर कुलूप लावून
बसलेल्या पालिका वार्ताहर संघाच्या वरिष्ठ व स्वयंघोषित अ शा पदाधिकाऱ्यांनी मुंबई महानगर पालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यापर्यंत हा प्रकार नेवून सदर ललनेला समज देण्यास सांगितले. जनसंपर्क अधिकारयानेही या ललनेला जबरदस्त झापले असून असून असे प्रकार पालिकेत खपवून घेणार नाही अशी तंबी दिली असल्याचे समजते.
आपले पितळ उघडे
पडल्याने या ललनेने आपली बदनामी केली असे कारण देत, पालिकेमध्ये वृत्तसंकलन
करणाऱ्या पत्रकारांनीच हा प्रकार बेरक्यावर टाकल्याचा संशय घेतला आहे. पालिका वार्ताहर संघ कशा प्रकारे चुकीची कामे करणाऱ्या पत्रकारांना पाठीशी घालतो हे उघड करावे म्हणून बेरक्याच्या टीमने मुंबई महानगर पालिकेमध्ये येवून केलेल्या शोधक वृत्तीमधून हा प्रकार उघड केलेला आहे, यामुळे येथील पत्रकारांचे या प्रकरणात काहीही देणे घेणे नाही.
पालिका वार्ताहर संघाच्या स्वयंघोषित पदाधिकार्यांनी अशा प्रकारांची वेळीच
दखल घेतली असती तर बेरक्यावर असे प्रकार प्रसिद्ध करण्याची गरजच भासली
नसती. हे पालिकेमध्ये स्वयंघोषित पद्धतीने वार्ताहर संघाचे पदाधिकारी
होणाऱ्यांना बेरक्याने सांगण्याची गरज नसावी असे वाटते.