आजचा सवाल...

( ठाम मत कार्यालय,मुंबई )
पेंद्या - राम...राम...बगळे साहेब...
बगळे - तु कोण, आणि इथं कशासाठी आला आहेस...
पेंद्या - अवं,तुमचा आजचा सवाल मी कधी - कधी पाहतो,म्हटलं मी पण एक सवाल विचारावा...
बगळे - सवाल विचारण्याचा अधिकार फक्त मलाच आहे, तुला नाही...चल निघ येथून,मला आजचा सवालसाठी विषय निवडाचाच...
पेंद्या - का नाही विचारू शकत,सवाल विचारण्याचे कंत्राट तुम्हाला एकट्याच मिळाले आहेत का...
बगळे - सवाल विचारण्याचा अधिकार फक्त मलाच आहे आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार माझ्या विरोधी चॅनलला आहे...
पेंद्या - विरोधी चॅनलका का प्रतिस्पर्धी चॅनलला...
बगळे - मला उलट सवाल विचारू नको...असे प्रश्न फणसला विचारू शकतोस...
पेंद्या - त्यांच्याकडे जावून आलो साहेब,ते म्हणत्यात अजून आमचं चॅनल सुरू झालं नाय...तु बगळे साहेबांकडे जा...
बगळे - चॅनल सुरू झालं नसेल तर इंडियाच्या वेबसाईटवर दाखव म्हणावं...
पेंद्या -  मला वेबसाईटवर नको, चॅनलवर चमकायचं...
बगळे - तु का मोठा नेता लागून गेला की मोठा पत्रकार...
पेंद्या - का वो, चॅनलवर फक्त बाळच चालतात का, आही नाही चालत का...
बगळे - अरे बाळ, बाळ मोठा पत्रकार आहे, तु अजून बाळ आहेस...
पेंद्या - ऑ...ते बी बाळ,मी बाळ.. मग ते का तुमचं लाडकं बाळ आहे का...
बगळे - अरे ते फार मोठे पत्रकार आहेत, असं त्यांच्याविषयी बोलू नकोस...
पेंद्या - ते मोठे पत्रकार होते,आता नाहीत.तुमच्या ठाम मतने त्यांना मोठं समजणं सुरू केलय...
बगळे - अरे माझं डोकं आता खावू नको...चल निघ आता,मला पाईप टाइमची तयारी करायची आहे...
पेंद्या - अवं त्यासाठी धुपलेली अलका असतेच की...तुम्ही कशाला टेन्शन घेता...
बगळे - अरे जोडीला मी असतो, नाही तर टी.आर.पी.घसरायचा...
पेंद्या - हा टी.आर.पी.अजून नवा कोण ? फणस गेल्यावर त्याला घेतले की काय...
बगळे - तुला, चॅनल,टी.आर.पी.नाही कळत...अशा गोष्टीत तु लक्ष घालू नकोस...
पेंद्या - साहेब, सोडून बोला, तुमच्या बाष्पळ बडबडीनंच टी.आर.पी.घसरलाय...
बगळे - ऑ, असं कोण म्हटलं...माझ्यामुळंच चॅनल टिकूण आहे...
पेंद्या - पण तुम्ही  कोणाला टिेकू देत नाही, नायतर तुमचं चॅनल कुठल्या कुठं गेल असतं...
बगळे - मी कोणाला जायला सांगितले नाही,तो मॅनेजमेंटचा निर्णय आहे...सगळं खापर माझ्यावरच फोडतात..
पेंद्या - साहेब, ठाम मतचे निम्मे लोक जय महाराष्ट्र म्हणत फणसकडे गेले,आता तुमचं कसं होणार ...
बगळे - मी कोणाला घाबरत नाही, शेवटी ठाम मत , ठाम मतच आहे....
पेंद्या - तुम्ही कशाला घाबरता,लोकांना घाबरवता...कारण सवालमध्ये कोणाला बोलूच देत नाहीत ना...थोडं कोण बोलायला लागलं की, थोडं थांबा,येतो मी पुन्हा तुमच्याकडे म्हणता,आणि शेवटपर्यंत येतच नाहीत आणि शेवटी टक्केवारीवर येता...
बगळे - अरे टक्केवारीशिवाय कार्यक्रम पुर्ण होतच नाही...
पेंद्या - आता कसं खरं बोललाव...सगळं टक्केवारीवर चालू, त्यालाच टी.आर.पी.म्हणायचे ना...
बगळे - अरं ती टक्केवारी नाही, लोक काय म्हणतात, त्या टक्केवारीवर बोलतोय...
पेंद्या - सवाल काय आणि प्रश्न काय...एकूण एकच ना...
बगळे - आता चलतो मी,पाईप (प्राईम) टाईमची वेळ झाली...अगं अलका सुरू कर...
पेंद्या - साहेब..साहेब...आपला सवाल राहिलाच की...अजित दादां यावेळी खरंच राजीनामा देणार का...
बगळे - आता ऐका - आजचा सवाल - अजित दादा यावेळी खरंच राजीनामा देणार का...
अलका - अवं सर, आता सध्या प्राईम टाईम आहे...सवाल नंतर आहे...
बगळे - राहू दे आता....'आजचा सवाल' महत्वाचा आहे...पाईप सॉरी प्राईम टाईम नंतर कर...
अलका - सर,बाळ अजून आले नाहीत...मग मी थांबू का,आजच्या सवालसाठी...
बगळे - चालेल, नो प्राब्लेम...वाटल्यास अजित दादांना फोन कॉल करू...
(दादांना फोन कॉल)- - दादा, एकाची लघु - शंका आहे, माझी नाही....तुम्ही खरचं राजीनामा देणार का...
दादा - अहो, बगळे, या लघुशंकेमुळंच मी अडचणीत आलो आहे, आणि तुम्ही लघुशंका काढता...
बगळे - दादा, तुमचा काही तरी गैरसमज होतोय, ती लघु - शंका नाही, वाटल्यास शंका म्हणा...
दादा - मग निट शंक मारा की ...सगळे आमदार म्हणतात,नका देवू राजीनामा...साहेबांना आम्ही सांगू म्हणतात...
बगळे - (दादांचा फोन कॉल कट करून) आता ऐका - महत्वाची ब्रेकिंग न्यूज - दादा राजीनामा देणार नाहीत...
अलका - सर,आज पाईप ओढला नाहीत का, सांरखा प्रोग्राम का बदलत आहात...
बगळे - नाही गं, कोण तर पेंद्या आलाय, त्यानं सगळा घोटाळा केला...
अलका - सर, या घोटाळ्यावरच आजचा सवाल करायचा का...
बगळे - (चिडून) तू आता पाईप सॉरी प्राईम टाइम सुरू कर...
अलका- चालेल, आजचा सवाल कॅन्सल...आता ऐका हेडलाईन्स....

( हेडलाईन्समध्ये पुन्हा तेच - अजित पवार राजीनामा देणार नाहीत )
......................................

* प्राईम टाइम संपल्यानंतर बगळे पाईप ओढायला जातात...त्याअगोदरच पेंद्या बगळेंना कस बनवंल म्हणून गालातल्या गालात हसत निघून जातो...