जय महाराष्ट्र...



आज पहाटाच्यापास्नंच ट्विटवर बगयाची टीव टीव सुरू होती. कोणी यावं टिचकी मारून जावं तसं कोणी बी याव अन् न्यूज चॅनल सुरू करावं अस थे म्हणत व्हते. त्याले कारणबी तसंच व्हय. दरववर्षी ‘एक मेला‘ (की) सगयाले ‘जय महाराष्ट्र‘ आठोथे. यंदात थ कोण्या शेट्टी न अख्ख्या महाराष्ट्रालेच ‘जय महाराष्ट्र‘ केल्ला. (आतालोक महाराष्ट्राले दोन शेट्टी मालूम व्हते. एक सुनील अन् दुसरी आपली गोळ शिल्पा. आता भर उन्हायात ‘सुधाकर‘ उगवला) थ्यानं बीयरच्या पाटलीनं अख्ख्या महाराष्ट्राच पाणी शोषून घेत्ल. असा बयगे म्हणतात. थ्यामुयच सध्या दुष्कायाचे दिवस सुरू हैत. पाणी टंचाई असल्यानं बगयाले मासुयाच उरल्या नै. ज्या व्हत्या त्यायनं बी थ्याले ‘जय महाराराष्ट्र‘ केल्ला. थ्यामुयं. आपोआपच ‘अंबा-फणसाचे‘ चे दिस आल्ले. मंग काय चिल्लाहू राह्यले टीव टीव करत बयगे. आता थ त्यायले पोट ‘पूजा' कारायल्ले जुना बार बी उरला नै. थ्याच बारच्या मालकानंच म्हणे न्यूज चॅनल काळल्लं. थ्यामुयं बगयाले लैय दुःख झालं. थे पेंद्याले म्हण्ले बी, ‘‘ अबे पेंद्या मालं त डोक्सच चालू नै राह्यलं बॉ ! म्या बी बारच टाकयले पाहिले व्हता ‘महानगरात‘.
पेंद्या : हाव ना सायेब तुमचं डोक्स नाही तोंळ चाल्ते लै. आज तुम्ही बी मालक अस्ते ‘वृत्त वहिनी'चे
बयगे : कायले काम करू राह्यला तू पत्रकार म्हून. कोण घेत्ल तुले? ‘वृत्त वहिनी‘ नै ‘वृत्तवाहिनी'
पेंद्या : तुमीच थ घेत्ल सायेब मले. जाऊ द्या ! अशाच वहिन्याले नाचवून नाचवून थ्यानं वाहिनी काळली ना !
बयगे : हाव ना बे ! मले थ काही सुधरू नै राह्यलं. आपल्या कोकणातील ‘नारूदा'नं बी थ्याल्ले मदत केल्ली म्हणतात?
पेंद्या : सायेब एक सांगतो लहान तोंळी मोठा घास तसं. आपण याचा इचारच करू नै. ‘महाराष्ट्रा‘त उजेळ पाळायच्या भानगळीत आपल्या खालचा अंधार पायत जा !
बगये : म्हण्जे?
पेंद्या : परवा संजय आवटे सायेबानं थ्यायच्या वॉलवर एक लैयच खास पोस्ट टाक्ली. ‘मेरे पास मीडिया है‘ ही. थ्यात थ्यायनं शेखर गुप्ता यांनी थ्यायच्या ‘नॅशनल इंटरेस्ट‘ या स्तंभात काय लिव्हलं थे सांग्लं.
बगये : म्या कसं नै वाचलं?
पेंद्या : तुमालेच सवाल करता करता टेम कुठं भेटते सायेब?
बगये : बरं बरं काय व्हत थ्यात?
पेंद्या : लै मार्मिक अन् इचार करायले लावणार व्हत सायेब. अंबानीज् (ऑब्झव्र्हर), विजयपत सिंघानिया (इंडियन पोस्ट), एल. एम. थापर( द पायोनीअर), संजय दालमिया( संडे मेल), ललित सुरी (दिल्ली मिड डे) यायले मीडियाच्या धंद्यात अपयशाचा झटका बसला ... तरीही इथं गुंतवणूक करायले मोठ्या संख्येनं मंडयी येत है. काहून ?
बगये : काहून बॉ..
पेंद्या : थ्येच थ. हे लोक पेपर, न्यूज चॅनल सुरू करतात. त्यायले पत्रकारितचा आदर नै. त्यायले मालूम है तुमच्या सारखे लै पत्रकार उपलब्ध हैत. आंबा-फणसाचा रसबी थेच पिणार हैत. पॅकेज देऊन इकत घेतल्यासारखं. कारण हे बुद्धिजिवी भाळ्यानं मियू राह्यले ना ! त्यायले जर रंगिला औरंगाबादीसारखी गाळी-घोळी देल्ली की झाल्लं. हे पत्रकार तुम्हाले सन्मान मियवून देतील, मग राजकारणी, विचारवंत, सेलेब्रिटी सगये तुमच्या अवती-भवती, फिरतील.
बगये : अबे पेंद्या तुयाल्या चिभेले काई हाळ बिळ व्हय का नै? अबे थ आपल्या मालकानं बी आपल्याले असंच पॅकेज देऊन इकत घेत्ल ना !
पेंद्या : अन् रंगिला औरंगाबादीसारखं कव्हा हाळ हाळ करतील हैबी सांग्ता येणार नै सायेब.. साधा ‘जय महाराष्ट्र‘ बी करणार नैत.. काय?
पेंद्याचं हे बोलनं ऐकून बगये कव्हा नै थे विचारमग्न झाल्ले.