अमरावती
: दिव्य मराठीच्या आगमनामुळे सकाळची गळती थांबविण्यासाठी मुख्य संपादक
श्रीराम पवार दोन दिवसांपासून अमरावतीत आहेत. सकाळमधील ज्यांना कुणाला
डीएमचे ऑफर लेटर आले त्यांनी सकाळ सोडून जाऊ नये यासाठी पवार प्रयत्न करीत
आहेत. त्यांच्यासोबत विदर्भ आवृत्तीचे संपादक भूपेंद्र गणवीर हेसुद्धा
आहेत. दरम्यान, रिकाम्या जागा भरण्यासाठी श्रीराम पवार आणि गणवीर यांनी
अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील अनेक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या; पण आता
सकाळ प्रशासन अनुभवी पत्रकारांना घेण्याऐवजी पत्रकारितेत नव्याने
आलेल्यांना संधी देणार असल्याचे यातून दिसून आले. मुलाखतीला अधिकाधिक
नवोदित पत्रकारांनाच बोलावण्यात आले. कारण अनुभवी पत्रकार पाच-सहा महिने
काम करून पुन्हा दुस-या दैनिकात जास्त पगारावर रुजू होतात हा अनुभव सकाळला
आला आहे.
....
बुलडाणा : गजानन जानभोर यांनी बुलडाणा जिल्हा कार्यालयात बुधवारी बैठक घेतली. तालुका आणि शहर प्रतिनिधी उपस्थित होते. पण खामगाव कार्यालयात संपादकीय प्रमुख कधी देणार यावर तोडगा निघाला नाही.
....
बुलडाणा : गजानन जानभोर यांनी बुलडाणा जिल्हा कार्यालयात बुधवारी बैठक घेतली. तालुका आणि शहर प्रतिनिधी उपस्थित होते. पण खामगाव कार्यालयात संपादकीय प्रमुख कधी देणार यावर तोडगा निघाला नाही.