अकोला - १५ ऑगस्ट किंवा तत्पुर्वी अकोल्यात दिव्य मराठी अर्थात डी.एम.सुरू होणार आहे.त्यानंतर अकोल्यात देशोन्नती,लोकमत आणि दिव्य मराठी असा तिरंगी सामना रंगणार आहे.
डी.एम.साठी निवासी संपादक म्हणून गजानन जानभोर यांना निमंत्रण होते,मात्र जानभोर यांनी नकार दिल्यामुळे डी.एम.ला चांगला निवासी संपादक अजूनही सापडला नाही.त्यामुळे सध्या औरंगाबादेत डी.एम.मध्ये वृत्तसंपादक असलेल्या देविदास लांजेवारवर संपादकीय जबाबदारी सोपाविण्यात येणार माहिती बेरक्याकडे प्राप्त झाली आहे.लांजेवार अकोल्यात आल्यास डी.एम.मध्ये भविष्यात मोठी डोकेदु:खी होणार आहे.त्यामुळे डी.एम.काय भूमिका घेणार,याकडे लक्ष वेधले आहे.
डी.एम.च्या पाश्र्वभूमीवर लोकमतने चांगला बदल केला आहे.वादग्रस्त प्रेमदास राठोड यांना तातडीने मुंबईला हलवून,त्यांच्या जागी गजानन जानभोर यांना नियुक्त केले आहे.जानभोर तीन दिवस अकोला,तीन दिवस नागपूर आणि एक दिवस सुट्टीवर राहणार आहेत.अकोल्यात लोकमतचे अनेक संपादकीय प्रमुख आले आणि गेले,मात्र जानभोरची कारकिर्दच सर्वांना लक्षात राहणारी ठरली आहे.म्हणूनच त्यांच्या नियुक्तीचे अनेकांनी स्वागत केले आहे.
लोकमतने आणखी एक बदल म्हणजे लेआऊट चेंज केला आहे.तो दिव्य मराठीशी मिळता - जुळता आहे.दिव्य मराठी सुरू झाल्यानंतर कोण - कोणाची कॉपी करतोय,या संभ्रमात वाचक पडतील.तसेच लोकमतने अंकाची किंमत दोन रूपये करून,मोठे आव्हान निर्माण केले आहे.
लोकमतने डी.एम.च्या पाश्र्वभूमीवर अनेक बदल आणि योजना आखत असताना, देशोन्नती मायभूमी असलेल्या अकोल्यातच शांत आहे.खरे तर देशोन्नतीने सर्वाधिक काळजी आणि बदल करायला हवे होते.देशोन्नतीचे अनेक उपासंपादक,रिपोर्टर दिव्य मराठीच्या वाटेवर आहेत.आम्ही शेतक-यांचे कैवारी आहोत,वाचक,शेतकरी केवळ देशोन्नतीच घेतील,असा भ्रम प्रकाश पोहरे यांना आहे.हा भ्रमाचा हा भोपळा दिव्य मराठी सुरू झाल्यानंतर फुटणार आहे.
लोकमतने दिव्य मराठीत जाणा-या रिपोर्टर आणि उपसंपादकांना थोपविण्यासाठी पगारवाढ करण्याची गरज आहे.तसेच प्रेमदास राठोड यांच्यामुळे दु:खावलेल्यांची समजुत काढण्याची गरज आहे.
दिव्य मराठीच्या अभिलाष खांडेकरांनी भरती करताना,काही विशिष्ठ जातीस प्राधान्य दिले आहे.हा त्यांचा आत्मघात ठरणार आहे.पुरोगामी महाराष्ट्रात जाती - पातीची बिजे आता चालणार नाहीत,हे खांडेकरांना कोणी तरी समजून सांगण्याची गरज आहे.
लोकमतच्या दर्डा शेठनी कधीच जात - पात पाहिली नाही,म्हणूनच लोकमतची दिवसेंदिवस प्रगती होत आहे.डी.एम.चा मालक अग्रवाल शेठ करोडो रूपये खर्च करीत आहेत.मात्र खांडेकरांसारखा जातीयवादी माणूस हे रूपये पाण्यात घालत आहे.डी.एम.ला महाराष्ट्रात भक्कमपणे उभे राहायचे असेल तर खांडेकरांची तातडीने अन्य राज्यात उचलबांगडी करण्याची गरज आहे.
खांडेकरांजवळ औरंगाबादेत एक चमचा बसला आहे.हा चमच्या सॅटेलाईट एडिटर असल्याचे सांगतो.त्याने खांडेकरांचे कान फुंकून अनेकांचे नुकसान केले आहे.या चमच्याचा समाचार बेरक्या लवकरच घेणार आहे.खांडेकर गेल्यानंतर त्याचीही उचलबांगडी अटळ आहे.