मु.पो.अकोला

अकोला - गजानन जानभोर यांच्यावर लोकमतने अकोल्याचे प्रभारी संपादकिय प्रमुख म्हणून जबाबदारी टाकली. त्यामुळे काही दिवसानंतर जानभोर हे नागपुरला परत जाणार आहेत हे निश्चित. त्यामुळे अकोल्याला लोकमतच्या नागपुर कार्यालयात कार्यरत असलेले मुख्य उपसंपादक दिपक देशमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख गजानन चोपडे, त्यांचे सहायक गोपालकृष्ण मांडवलकर यांची नावे नवीन संपादकीय प्रमुख चर्चेत आहेत. यापैकी दिपक देशमुख यांना अकोल्यात काम करण्याचा अनुभव आहे. १९८८ मध्ये त्यांनी लोकमतमध्ये मेहकर तालुका प्रतिनिधी म्हणून कामास सुरुवात केली. १९९० मध्ये ते लोकमतचे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी झाले. पुढे लोकमतची अकोला आवृत्ती सुरू होणार असल्याने त्यांची अकोला येथे बदली केली. या काळात तत्कालीन संपादकिय प्रमुखांच्या गैरहरीत ते संपादकिय प्रमुख म्हणून सर्व काम पाहात असत. तसेच अकोला, बुलडाणा आणि वाशिम हे हॅलो पेजही त्यांनी प्रत्यक्ष त्या-त्या जिल्ह्यात काम करून सुरू केले. तिन्ही जिल्हा कार्यालयाचा सेटअप करून दिला. पुढे लोकमतने त्यांची नागपूरला बदली केली. त्यानंत वर्धा आणि भंडारा या जिल्ह्याचा सेटअप करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. तीही त्यांनी यशस्वी पार पाडली. त्यामुळे अकोला आवृत्तीचा देशमुख यांना अभ्यास आणि पूर्व अनुभव आहे. आता ते नागपूर कार्यालयात असतात. चोपडे आणि मांडवलकर हेही लोकमतमध्ये ज्येष्ठ आहेत. चंद्र्रपूर, यवतमाळ येथे त्यांनी काम केले आहे. सध्या दोघेही नागपूर कार्यालयात असतात. या तिघांपैकी तत्कालीन संपादकिय प्रमुख अविनाश दुधे यांच्या बदलीनंतर एकाची अकोला येथे संपादकिय प्रमुख म्हणून वर्णी लागणार होती. पण प्रेमदास राठोड यांना संधी देण्यात आली. आता पुन्हा या त्रिमुर्तीच्या नावाचा विचार होत आहे. पण या तिघांपैकी नेमकं अकोल्याला कुणाला पाठविले जाते याकडे लक्ष लागून आहे.

.