मुंबई
 महानगर पालिकेमध्ये वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांना पालिका 
रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळावेत अशी मागणी जर्नलिस्ट युनिअन ऑफ 
महाराष्ट्रच्या वतीने मुंबईचे महापौर सुनील प्रभू व पालिका आयुक्त सीताराम 
कुंटे यांच्याकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र 
शासनाकडे अधिस्वीकृत पत्रकार म्हणून नोंद असलेल्या पत्रकारांना शासकीय 
रुग्णालयात मोफत उपचार घेण्याची सोय आहे. अशी सोय मुंबई महानगर पालिकेमध्ये
 वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना पालिकेकडून दिली जात नाही. महापौर सुनील 
प्रभू व आयुक्त सीताराम कुंटे यांनी लवकरात लवकर निर्णय घेवून 
शासनाप्रमाणे पालिकेमधील पत्रका रांना  रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत अशी मागणी जर्नलिस्ट युनिअन ऑफ महाराष्ट्रचे महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ व मुंबई अध्यक्ष अजेयकुमार जाधव यांनी केली आहे.
 याबाबतचे निवेदन विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम, भाजपा गटनेते दिलीप 
पटेल, मनसेचे गटनेते दिलीप लांडे, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, 
राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यानाही देण्यात आले आहे.