मुंबई - सुधाकर शेट्टीचे जय महाराष्ट्र न्यूज चॅनल १ मे रोजी सुरू झाले. हे चॅनल केवळ व्हीडीओकॉन डीटीएचवर दिसत आहे. अन्य डीटीएचवर अद्याप दिसत नाही.मुंबईसह राज्यातील अनेक केबल ऑपरेटरशी चर्चा न झाल्याने हे चॅनल अजूनही अनेक शहरात केबलवरही दिसत नाही.
गेल्या सात दिवसांत ज्यांनी चॅनल पाहिले,त्यांच्या प्रतिक्रिया समाधानकारक नाहीत.पिच्चर क्लॉलिटी एकदम अंधुक आहे. बातम्यांचे सादरीकरण योग्य नाही.स्क्रीनवर जे अक्षर येतात,ते अत्यंत लहान आहेत.ग्राफीक्स चांगले नाही,अशा एक ना अनेक वाईट प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या.
स्ट्रींजर रिपोर्टरही या चॅनलबाबत बोंब मारीत आहेत.हे चॅनल १ मे रोजी लॉन्चिंग झाले असले तरी, अनेक स्ट्रिंजर रिपोर्टर गेल्या सात - आठ महिन्यापासून काम करीत आहेत. खिशातील पैसे घालून दीडशे ते दोनशे किलोमीटरचे अंतर कापायचे, शॉट घ्यायचे, स्टोरी तयार करायची आणि इंटरनेटवर तासन् तास बसून त्या चॅनलकडे पाठवायची...त्या स्टो-या जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वेबसाईटवर वापरण्यात आल्या, पण प्रचंड मेहनत करूनही मानधन नाही की खर्च नाही. सुधाकर शेट्टी करोडपती असले तरी,बिचा-या स्ट्रिंजर रिपोर्टरच्या पदरात अजून एक दमडाही पडला नाही.
एका स्टोरीला किती पैसे देणार, खर्च देणार की नाही,याचा खुलासाही अद्याप करण्यात आला नाही.बिचारे स्ट्रिंजर रिपोर्टर याबाबत विचारणा केली तर पाहू, करू या मोघम उत्तरे देण्यात येत आहेत.त्यामुळे अनेक स्ट्रिंजर रिपोर्टर जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत.
जाता - जाता : सुधाकर शेट्टी यांनी बडेजावपणा करण्यासाठी दुष्काळग्रस्त निधी म्हणून मुख्यमंत्र्याकडे एक कोटी रूपयाचा धनादेश दिला.मात्र याच शेट्टींनी स्ट्रींजर रिपोर्टरच्या हातात वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत.