जळगावातील छायाचित्रकारांची 'मनसे'कडे लाचारी

सध्या जळगावातील पत्रकारिता या ना त्या कारणाने चर्चेत आहे. जळगावात पत्रकारांपेक्षा चालती आहे ती  छायाचित्रकारांची! 'बेरक्या'कडे आलेल्या एका यादीनुसार, जळगावातील सर्व वृत्तपत्रांच्या  छायाचित्रकारांनी अलीकडेच जळगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची जंगी सभा यशस्वीरित्या,'ललित'पूर्णरीत्या आयोजित करून दाखविणारया तरुण कार्यकर्त्याकडून प्रत्येकी एक हजार रुपयांची 'बक्षिसी' स्वीकारली आहे. पाकिटाचा हा व्यवहार एका आघाडीच्या खासगी बँकेतील नोकरी सोडून राजकीय कार्यकर्त्याकडे नोकरीचा 'योग' स्वीकारणारया विश्वासू माणासामार्फ़त पार पडला. या विश्वासूने दोन मुख्य वृत्तपत्रांच्या पत्रकारांना यापेक्षा २५ पट मोठे पाकिट देउ केले होते. पण 'मनसे'च्या प्रसिद्धीच्या कंत्राटाचे हे काम दोघा पत्रकारांनी नाकारले. आता  छायाचित्रकारांना दरमहा एक हजाराचे पाकिट ठरविण्यात आले आहे. त्यामुळे आता 'आरटीओ' पाठोपाठ जळगावात दरमहा पाकिट वितरीत करणारी 'मनसे' ही दुसरी 'पार्टी' तयार झाली आहे.
 'आरटीओ'च्या यादीतही बहुतांश वरचीच सर्व माणसे आहेत. फक्त तिथे पत्रकारांची एक स्वतंत्र यादी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नि:पक्ष-निर्भीड आणि भ्रष्टाचारमुक्त पत्रकारितेचा दावा करणारया 'डीएम'मधील माणसे या व इतरत्रही यादीत असणे हा म्हणजे फारच मोठा विनोद आहे. 'डीएम'ची  दोघे माणसे या 'आरटीओ'च्या पत्रकारांच्या यादीत आहेत.  त्यातील एक मुरुमाच्या; गौण खनिजाच्या बातम्यांना गती देउन मध्येच थांबविणारा व तहसीलदारांकडून पुरेपूर 'वसुली' करणारा आहे. 'डीएम'ची जळगावातील पत्रकारिता 'कलंकित' होत चालली आहे. आव आणायचा, बडेजाव मिरवायचा आणि नंतर 'सेटलमेंट' करायची असा नवा खेळ सुरू झालाय. तहसीलदार कैलास देवरे व महापौर किशोर पाटील या दोघांना विचारले तरी 'डीएम'च्या नि:पक्ष आणि निर्भिडतेच्या चिंधड्या उडतील. उद्योजक रजनीकांत कोठारी यांच्या सुनेने एका निरपराध गरीब माणसाला कारने चिरडले  त्या प्रकरणात 'डीएम'ने नंतर शेपूट का घातले? कुणाच्या पदरी काय पडले? दोघा छायाचित्रकारांसोबतच कुणीकुणी 'केके'ची पाकिटे स्वीकारून प्रकरण दडपले? कोठारीच्या नाती, परिवाराची किती  छायाचित्रे 'डीएम'ने छापली? जळगावात दुसरे कुणी दिवाळीत रांगोळ्या घालीत नाही का? हा 'व्यवहार' कुणी घडवून आणलाय? त्यानंतर कुणाला कोठारींची  फोटोंची ऑर्डर मिळाली.  'डीएम'मध्ये नोकरी सांभाळून बाहेरची 'लाचारी' केलेली चालते का?

राष्ट्रपती प्रतिभाताई यांच्या बांभोरी अभियांत्रिकी कॉलेजात विद्यार्थ्यांचा छळ झाला. त्यात 'डीएम'वाल्यांनी काय सेटलमेंट केली. पहिल्या  दिवशी बातमी छापली मग फॉलोअप का नाही? तो का दाबला? 'डीएम'चे क्राईम रिपोर्टर आणि संपादक याचे उत्तर देतील का? संपादक केबिनबाहेर येवून 'डीएम'वाले जे काही घपले करताहेत, लूट करताहेत, खंडणी वसुलताहेत ते पाहणार आहेत की नाही? की काचेच्या चार भिंतीतच त्यांचा कारभार चालणार आहे. औरंगाबादमधील 'डीएम' वरिष्ठही जणू डोळे मिटून आहेत. त्यामुळे जळगावच काय सर्वत्र मांजरी दूध पिऊ लागल्या आहेत. महाराष्ट्राची 'डीएम' कडून फार अपेक्षा आहे; पण सध्या तरी त्यांचेही पाय मातीचेच! अशी स्थिती आहे. तेव्हा गड्या आपला 'लोकमत'च बरा. तो निदान  नीतीमत्तेच्या फुकाच्या गप्पा तरी मारत नाही. 'डीएम'ची गोष्ट म्हणजे आव पतिव्रतेचा अन धंदे बाजारबसवीचे असे झालेय. 'बेरक्या'लाच नव्हे तर सर्व महाराष्ट्राला बघायचेच आता कोणते वृत्तपत्र काय कारवाई करते ते. आमचे खुले आव्हान आहे की कुणीही आम्हाला यात तथ्य नाही, हे सिद्ध करून दाखवावे.

जळगावातील महाराष्ट्र टाईम्सच्या हालचालींसह बराच मसाला 'बेरक्या'कडे आहे. तो पुन्हा कधीतरी पाहू.

ता. क. : उद्योगपती रजनीकांत कोठारी यांच्या 'केके' कंपनीतून फक्त 'डीएम'च नव्हे तर वरील यादीतील सर्व छायाचित्रकारांनी पाकिटे स्वीकारली. याच मंडळीने दिवाळीत कोठारींसह जळगाव 'एलसीबी' व 'राष्ट्रवादी'च्या 'मामा'कडूनही वसुली केलीय. जळगावातील पत्रकारांची दिवाळी कोरडी आणि छायाचित्रकार मजेत अशी स्थिती होती. नितीमत्ता खालावलेला, बहिण मानून एका अविवाहित सहकारयाच्या भावी वधूलाच प्रपोज मारणारा एक चळ लागलेला प्रौढ, विवाहित छायाचित्रकार जळगावात आहे .  त्याला साथ देतोय तो पत्रकार बनून शिंग फुटलेला एक पूर्वाश्रमीचा छायाचित्रकार … या सर्व नीच, 'काळ्या' कृत्यांवर 'बेरक्या'चा प्रहार लवकरच ….

जाता - जाता : मनसेकडून पाकीटे घेणाऱ्या छायाचित्रकारांची यादी बेरक्याकडे उपलब्ध आहे.ती कधी तरी प्रसिध्द करू...