अकोला
: काही वर्षांपूर्वी अकोल्यात झालेले वर्तमानपत्रांमधील किंमत युद्घ शांत
होऊन सर्व काही सुरळीत सुरु असताना एका मराठी दैनिकाच्या आगमनाची चाहुल
लागताच पुन्हा एकदा हे युद्घ पेटले आहे. या युद्घात वाचकांची चंगळ होणार
असून एक महिन्याच्या बिलात दोन महिने पेपर वाचायला मिळणार असल्याने
त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे या युद्घामुळे कमी खप असणा:या
वर्तमानपत्र संचालकांच्या पोटात गोळा उठला असून ही अयोग्य स्पर्धा असल्याचे मत व्यक्त होत आहे.
कागदाच्या किंमती प्रचंड वाढल्याने वृत्तपत्र
व्यवसायात मोठी अडचण निर्माण झाली आहे. वीजेचे वाढलेले दर व अन्य सर्वच
बाबी महाग झाल्याने वर्तमानपत्रांच्या किंमतीही वाढल्या आहेत. तरीही
वाचकांवर अतिरिक्त ताण पडू नये म्हणून वर्तमानपत्रांची किंमत जाहिरातीतून
काढण्यासाठी सर्वांची धडपड असते. सध्या असलेल्या वर्तमानपत्रांच्या किंमतीत
कागद आणि छपाईचा खर्च निघत नसताना केवळ स्पर्धेमुळे पुन्हा एकदा किंमत
युद्घ सुरु झाले आहे.
देशात क्रमांक १ असण्याचा दावा करणा:या वृत्तपत्र समुहाने गेल्या दोन
वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पदार्पण केले. या समुहाचे वर्तमानपत्र येत्या
तीन महिन्यात अकोल्यातून सुरु होणार असून दोन दिवसांपासून तोंडावर
चिकटपट्टी लावलेले होडॄग्स चौकाचौकात लागले आहेत. त्यांच्या तोंडावरची
चिकटपट्टी काढून या वर्तमानपत्राची अधिकृत घोषणा त्या होडॄगवर
होण्यापूर्वीच महाराष्ट्रात क्र.१ चा दावा करणा:या वृत्तपत्राने आपली किंमत
शनिवारपासून अध्र्यावर आणली आहे. या स्पर्धेत वितरकांचे नुकसान होऊ नये
म्हणून त्यांचे कमीशन कायम ठेवण्यात आले असून वाचकांसाठी अन्य काही स्कीमही
लवकरच जाहिर होणार आहेत. औरंगाबाद, जळगांव, उस्मानाबाद या ठिकाणी
आवृत्त्या सुरु झाल्यानंतरअकोल्यात येणारे वृत्तपत्र कोणत्याही परिस्थितीत
पुढे जाऊ द्यायचे नाही असा चंग येथील वर्तमानपत्राने बांधला असून
त्यादृष्टीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. किंमत कमी केल्यानंतर
हॉकर्स मंडळीसोबत सतत संपर्क आणि जाहिरात एजंंसीसोबतही हे वृत्तपत्र
सातत्याने संपर्क ठेऊन आहे. आपल्याकडील कर्मचारी ईकडेतिकडे जाऊ नाहीत
म्हणून सर्वांनीच त्यादृष्टीने फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. काहींनी
पगारवाढीचे तर काहींनी पदोन्नतीचे आमीष दाखवायला सुरुवात केली आहे.
आतापर्यंत दुर्लक्षित झालेला अमरावती विभागातील वृत्तपत्र सुष्टीतील
कर्मचारी आता एकदम उजेडात आला असून त्याच्या श्रमाला योग्य मोबदला मिळेल
अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, कमी खपाच्या वृत्तपत्र संचालकांच्या पोटात या स्पर्धेमुळे
गोळा उठला आहे. रेड्यांच्या टक्करीत आमचा चुराडा व्हायला नको अशा भावना
काही जण व्यक्त करीत आहेत. या स्पर्धेमुळे कर्मचारी, वाचक, जाहिरातदार
यांची चंगळ होईल एवढे मात्र निश्चित.