गेल्या
अनेक वर्षांपासून तुटपुं'या पगारात ढोर मेहनत करणा:या पत्रकार आणि
पत्रकारेतर कर्मचा:यांना गेल्या दोन वर्षांपासून चांगले दिवस आले आहेत.
चांगल्या दिवसाचे हे वारे यंदा'या मान्सूनबरोबर अकोल्यासह पश्चिम
विदर्भातल्या पाच जिल्ह्यात वाहायला लागल्याने बळीराजाप्रमाणेच या
कर्मचा:यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. कर्मचा:यां'या वेतनात वार्षिक २००
ते २५० रुपये वाढ करणा:यांची या नव्या वा:यांमुळे चांगलीच पंचाईत झाली
असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी केलेले शोषणही यानिमित्ताने उघड
झाले आहे.
कोणत्याही क्षेत्रात काम करणा:या कर्मचा:यांना त्या'या श्रमाचा योग्य
मोबदला मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा असते. हा मोबदला मिळत नसेल तर संबंधित
कारखानदार किंवा कंपनी मालकांवर कायदेशीर बडगाही उगारला जातो. असे असले तरी
वेगवेगळ्या कायदेशीर पळवाटा शोधून ही मंडळी आपले शोषणाचे काम अव्याहतपणे
सुरूच ठेवते. पत्रकारिते'या क्षेत्राचेही तेच झाले. या क्षेत्रात काम
करणा:या श्रमिक पत्रकारांना आणि पत्रकारेतर कर्मचा:यांना कामाचा योग्य
मोबदला मिळावा म्हणून शासनाने वेळोवेळी वेगवेगळ्या आयोगांची नेमणूक केली.
त्या आयोगांनी केलेल्या शिफारशींनुसार वर्तमानपत्रां'या मालकांनी
कामगारांना वेतन देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात असे कधीही घडले नाही.
चार-दोन मालक किंवा व्यवस्थापन याला अपवाद असतीलही, पण बहुतांश मंडळींनी
कामगारांचे शोषण करण्यातच धन्यता मानली. या क्षेत्रात नव्याने पाऊल
ठेवलेल्या अनेकांनी प्रस्थापित वर्तमानपत्रां'या मालकांवर, त्यां'या
व्यवस्थापनावर तोंडसुख घेत त्यांना भांडवली वर्तमानपत्र ठरविले.
प्रत्यक्षात भांडवलदारांविरुद्घ गळा काढणारी ही मंडळी बेमालूमपणे त्यां'याच
पंत्त*ीत जाऊन बसली.
कोणतेही वर्तमानपत्र स्वातंत्र्यपूर्व काळासारखे केवळ देशप्रेमा'या
भावनेतून किंवा जनजागृती'या उद्देशाने सध्या'या काळात चालविणे अशक्य आहे.
असे असले तरी वर्तमानपत्रांमध्ये असणारा प्रचंड जाहिरातींचा ओघ
वर्तमानपत्रां'या व्यवस्थापनाला तारत असतो. कितीही लपून ठेवले तरी पत्रकार
आणि पत्रकारेतर कर्मचा:यांना आपल्या व्यवस्थापनाचा ताळेबंद पुरेपूर माहिती
असतो. संपूर्ण जगातील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्या'या बाता मारणा:या
या पत्रकारांकडून स्वत:वरील अन्यायासाठी मात्र चकार शब्द काढता येत नाही,
हे मोठे दुर्दैव आहे. असा शब्द काढणे म्हणजे तो मालक किंवा व्यवस्थापना'या
विरुद्घ केलेला विद्रोह असतो आणि असा विद्रोही पत्रकार व्यवस्थापनाला चालत
नाही. परिणामी, बाहेर छाती काढून पत्रकारितेचा तोरा मिरविणारे पत्रकार
शेपूट घालून वर्षानुवर्षे निमूटपणे आपले काम करीत असतात.
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात मात्र या क्षेत्रात निर्माण
झालेली स्पर्धा या क्षेत्रातील कामगारां'या आपोआप पथ्यावर पडली आहे. अर्थात
यासाठी कोणी भाग्यविधाता समोर आलेला नाही. या क्षेत्रातील मर्यादित
मनुष्यबळ, नव्या तरुणांनी या क्षेत्राकडे फिरविलेली पाठ यामुळे आपोआपच
रोजगारा'या जास्त संधी आणि तोकडे मनुष्यबळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
औरंगाबाद शहरापासून दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली या क्षेत्रातील माणसांची
टंचाई अद्यापही कायम आहे. विदर्भात काही वर्षांपूर्वी बदमाशी चालायची.
इकडे माणसे मिळत नसतील तर मराठवाड्यातून किंवा आणखी दुस:या भागातून माणसे
आणा, पण स्थानिक कर्मचा:यांचे पगार वाढवायचे नाहीत, अशी हेकेखोर भूमिका
अनेक वर्षे चालली. व्यवस्थापना'या दुर्दैवाने आणि कामगारां'या सुदैवाने आता
सर्वच ठिकाणी स्पर्धेची परिस्थिती निर्माण झाल्याने त्या-त्या भागातील
माणसांना तेथेच काम उपलब्ध होत असल्याने ते दुस:या ठिकाणी जायला तयार
नाहीत. परिणामी, पूर्वीचा हा डावही आता चालेनासा झाला असून, विद्यमान
कर्मचा:यांना वेतन वाढवून दिल्याशिवाय अनेकांपुढे पर्याय उरला नाही.
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून जी वर्तमानपत्रे यापूर्वी फत्त*
मुंबई किंवा अन्य विशिष्ट भागातून प्रकाशित व्हायची त्यांनी संपूर्ण
महाराष्ट्रात पाय पसरायला सुरुवात केली आहे. उत्तर भारतात सर्वत्र असलेले
एक हिंदी वृत्तपत्र समूह मराठी वृत्तपत्र घेऊन महाराष्ट्रात आल्याने या
स्पर्धेत आणखीच वाढ झाली. याशिवाय अन्य काही वर्तमानपत्रेही येथे येऊ
घातल्याने पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचा:यांची मजा झाली आहे. आतापर्यंत
'यांना तुसळेपणाने वागविले जात होते अशां'या पाठीवरून आता अचानक हात
फिरवूनही उपयोग होत नसल्याची अनेक उदाहरणे दिसून येत आहेत. पत्रकार म्हणून
काम करणा:या बहुतांश मंडळींना पैसा ही बाब गौण असते. त्यां'यामध्ये असणारा
ÓरहेमानÓ त्यांना चूप बसू देत नाही म्हणून ते या क्षेत्रात आलेले असतात.
अशा मंडळींना धन मिळाले नाही तरी चालते, पण मानाची अपेक्षा असते. त्यांचा
वेळोवेळी मानभंग होत असेल तर मात्र ते धनाची पर्वा न करता संबंधित
व्यवस्थापनाला पाठ दाखविल्याशिवाय राहत नाहीत. पत्रकारांशिवाय उत्कृष्ट काम
करणारे ऑपरेटर, व्याकरणा'या चुका काढणारे मुद्रितशोधक, वितरणामध्ये काम
करणारी आवड असणारी मंडळी आणि 'या विभागावर वर्तमानपत्राची आर्थिक बाजू
भक्कम करण्याची जबाबदारी असते त्या जाहिरात विभागात काम करणारी Óस्मार्टÓ
मंडळी शोधता शोधता आता सर्वां'या नाकानऊ येणार आहे. बोटावर मोजण्याइतकी
प्रत्येक शहरातील किंवा जिल्ह्यातील ही मंडळी आता गेल्या अनेक वर्षांपासून
यां'यावर होत असलेल्या अन्यायाचा सूड उगविण्यासाठी स'ज आहे. अगोदर
व्यवस्थापन वेतन ठरवायचे व कामगार मान डोलवायचे, आता कामगार आकडा सांगतात
आणि व्यवस्थापन मान डोलवते हा कामगारांचा विजय आहे.
अॅड.सुधाकर खुमकर
मो.८८८८८ ४२४५७
(लेखक हे सिटी न्यूज सुपरफास्टचे संपादक असून, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष आहेत.)