मु.पो.अकोला

अकोला - दिव्य मराठीची अकोला आवृत्ती लवकरच सुरू होत आहे. दिव्य मराठीच्या पाश्र्वभूमीवर अकोल्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. लोकमतने प्रेमदास राठोड यांना हलवून पहिला धक्का दिला.त्याच राठोड यांना दिव्य मराठीत घेतले.तर टोकाचा विरोध असलेल्या देशोन्नतीतील रवी टाले यांना घेवून लोकमतने दुसरा धक्का दिला.
लोकमत एकीकडे अनेक व्यूहरचना करीत असताना,मायभूमीतच देशोन्नती शांत आहे.रवी टाले लोकमतमध्ये आणि अन्य काही जण दिव्य मराठीत गेले असताना,देशोन्नतीच्या पोहरे फॅमिलीला त्याचे काहीच सोयरसुतक वाटत नाही.खुद्द छोटे सरकार ऋषी पोहरे ऐन युध्दाच्या काळात अमेरिकेला गेले आहेत.
देशोन्नतीला अजून कॅप्टन मिळालेला नाही.कोच परदेशात...त्यामुळे देशोन्नतीची टीम हरल्यात जमा आहे.
त्यामुळे आता खरा सामना लोकमत विरूध्द दिव्य मराठी असा रंगणार आहे....

सकाळही काढणार अकोला आवृत्ती

दिव्य मराठीच्या पाठोपाठ सकाळचीही अकोला आवृत्ती लवकरच निघणार आहे.या आवृत्तीची प्रिटींग जळगावात होणार आहे.मात्र सकाळला संपादकीय टीम मिळणे अवघड झाले आहे.दिव्य मराठी आणि लोकमतमधून कोण फुटतो का,याची सकाळ वाट पहात आहे.शेवटी देशोन्नतीतील उरलेला स्टॉफ सकाळ फोडेल,असे चिन्हे आहेत.तोही नाही फुटल्यास बाहेरहून माणसे आयात करावी लागतील.