मुंबई - एकाद्या घटनेचे थेट प्रक्षेपण करायचे झाल्यास इलेक्ट्रॉनिक मीडियास ओबी व्हॅनची गरज भासत होती.ओबी व्हॅनची किंमत कोटीच्या घरात आहे. त्यातही बरेच अडथळे येतात.मात्र आता लाइव्ह बॉन्ड नावाची नविन टेक्नॉलॉजी आली आहे.
कॅमेरावर या यंत्रणेचे युनिट बसवून थेट प्रक्षेपण करता येते. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने ही यंत्रणा उपलब्ध केली आहे. दक्षिण मुंबईला जोडणा-या इस्टर्न एक्स्प्रेस फ्रीवे काल उद्घाटन झाले होते. १७ किलोमीटर लांबीचा हा रस्ता कसा आहे, याचे लाइव्ह प्रक्षेपण आज दाखविण्यात आले. खास रिपोर्टर विलास बडे यांनी त्याचे कव्हरेज केले.
ओबी व्हॅनला प्रवासाचे चित्रण करता येत नाही.मात्र या नव्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही अडचण आता दूर झाली आहे.विशेष म्हणजे ही यंत्रणा मुठीत धरता एवढी आहे. थ्रीजीच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने ऑलरेडी चार ओबी व्हॅन घेतल्या आहेत.आता ही यंत्रणाही आणल्यामुळे भविष्यात हे चॅनल कात टाकेल,अशी अपेक्षा आहे. बातम्या आणि टेक्नॉलॉजीत बदल केल्यामुळे जय महाराष्ट्र चॅनल आता पुन्हा चर्चेत आले आहे.
ता.क. - हे नविन युनिट कोणत्याही कॅमेरास बसते...त्यामुळे महाराष्ट्रातील रिपोर्टरना त्याचा लाभ होणार आहे..