‘महाराष्ट्राचा अप्रतिम महावक्ता-२०१४’ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

औरंगाबाद  - अप्रतिम मीडिया आयोजित ‘महाराष्ट्राचा अप्रतिम महावक्ता-२०१४’  या भव्य पब्लिक टॅलेंट रिअ‍ॅलिटी शो तथा खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या अभिनव स्पर्धेसाठी सर्व नागरिकांना प्रवेश खुला आहे. ‘न्यूजएक्स्प्रेस मराठी’  या आगामी वृत्तवाहिनीवरुन ‘महावक्ता’ वर आधारित मालिकेचे प्रसारण केले जाणार आहे. इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन मुख्य परिक्षक मानव विकास मिशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा भोगे व संयोजक मुक्त पत्रकार डॉ.अनिल फळे यांनी केले आहे.

जनता-जनार्दनाच्या ओठांवरील महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करणे, हा ‘महाराष्ट्राचा अप्रतिम महावक्ता-२०१४’  उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. नागरिकांना मनमोकळे बोलता यावे, यासाठी राजकारणापासून ते पर्यांवरणापर्यंतचे अनेक विषय देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी   www.apratimmahavkta.com (संपर्क ९८२२३३७५८२)या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका म्हणून आवडीच्या विषयांचे मुद्देनिहाय विचार व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन तसेच लिखित स्वरुपात वैयक्तिक माहिती व छायाचित्रासह ‘अप्रतिम मीडिया, पोस्ट बॉक्स क्र.५२१, क्रांती चौक पोस्ट ऑफीस, औरंगाबाद-४३१००५’ या पत्त्यावर पाठवाव्यात....