चंद्रकांत पाटील यांचा आय.बी.एन- लोकमतला रामराम

मुंबई - आय.बी.एन-लोकमतमध्ये आशिष दीक्षित आणि अलका धुपकर यांना न्यूज एडिटर केल्यानंतर,इनपूट हेड तथा डेप्युटी न्यूज एडिटर चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती.अखेर त्यास दुजोरा मिळाला आहे.
चंद्रकात पाटील हे गेल्या पाच वर्षापासून आय.बी.एन-लोकमतमध्ये होते.इनपूट हेड तथा डेप्युटी न्यूज एडिटर म्हणून ते काम पहात होते. आशिष दीक्षित आणि अलका धुपकर रिपोर्टर होते.मात्र दोन दिवसांपुर्वी बॉस असलेल्या चंद्रकांत पाटील यांना अर्धचंद्र देवून आशिष दीक्षित आणि अलका धुपकर यांना न्यूज एडिटर करण्यात आले.त्यानंतर नाराज होवून चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
स्पोर्टस् एडिटर संदीप चव्हाण यांनी आय.बी.एन.लोकमतमधील गलिच्छ राजकारणाला कंटाळून, राजीनामा दिल्यानंतर आणखी एकजण बाहेर पडणार असल्याचे वृत्त बेरक्याने दि.३ सप्टेंबर रोजी दिले होते.नंतर दि.६ सप्टेंबर रोजी बॉसचे झाले बॉस...चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त दिले होते,त्यासही अखेर दुजोरा मिळाला आहे.
गंमतशीर बाब म्हणजे,चंद्रकांत पाटील हे संपादक निखिल वागळे यांचे अत्यंत खंदे समर्थक होते,मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाकूक,पण पाटील यांनी राजीनामा सोपवत,मी मराठीचा रस्ता धरला आहे.

धुपकर आता क्र.२ वर
संपादक निखिल वागळे यांच्यानंतर आय.बी.एन.लोकमतमध्ये क्र.२ च्या पदावर अलका धुपकर आल्या आहेत.वागळे जेव्हा रजेवर असतात,तेव्हा त्याच सर्व कारभार पहातात आणि 'आजचा सवाल' कार्यक्रमही त्याच घेतात.आय.बी.एन.लोकमतमध्ये राजेंद्र हुंजे,रेणुका रामचंद्रन,अमोल परचुरे ही सिनिअर्स मंडळी असताना,धुपकर यांना पदोन्नती देण्यात आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आय.बी.एन.लोकमतमध्ये सध्या प्रचंड जातीयवाद सुरू आहे.तसेच अत्यंत गलिच्छ आणि खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे.त्याचा फटका चॅनलला बसल्यास आश्चर्य वाटू नये.