देशदूतचे सल्लागार संपादक सुरेश अवधूत यांचे निधन

नाशिक - आपल्या लक्षवेधी पत्रकारितेने स्वतंत्र मुद्रा उमटविणारे सिद्धहस्त पत्रकार, दै. ‘देशदूत’चे सल्लागार संपादक सुरेश नारायण अवधूत (७२) यांचे सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
अवधूत यांच्या पार्थिवावर येथील अमरधाममध्ये मंगळवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जिल्हाभरातून जनसागर उसळला होता.