नगरमध्ये तरूण तेजपालचा निघाला भाऊ, केला साफसफाई करणाऱ्या दलित महिलेचा विनयभंग

पणजी पाठोपाठ नगरमध्ये तहलका घडला आहे.एका 65 वर्षाच्या ज्येष्ठ पत्रकारांने रविवारी सकाळी साफसफाई काम करणाऱ्या दलित महिलेचा हात ओढून बळजबरी करणाऱ्याचा प्रयत्न केला, यावेळी सदर महिलेने आरडाओरड करताच सदर ज्येष्ठ पत्रकारांने धूम ठोकली.त्यानंतर सदर महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद देताच, पोलिसांनी सदर पत्रकारांच्या पार्श्वभागावर दंडुका मारत आणि लाथा-बुक्क्या घालत पोलीस स्टेशनला नेले.नंतर या ज्येष्ठ पत्रकारांवर विनयभंग,अॅट्रॉसिटी आणि नागरी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर शहरात पत्रकार कॉलनी आहे.या कॉलनीत प्रकाश भंडारे (वय 65) नावाचे ज्येष्ठ पत्रकार राहतात.त्यांच्या घरासमोरील साफसफाई करण्यासाठी एक दलित महिला येत होती.या साफसफाई करणाऱ्या महिलेवर या ज्येष्ठ पत्रकार महाशयांची नजर गेली.त्यांनी तिच्यावर पाळत ठेवून,रविवार दि.1 डिसेंबर रोजी तिचा हात पकडला आणि ओढत स्वत:च्या घरात नेण्याचा प्रयत्न केला.मात्र सदर महिलेने आरडाओरड करताच,या ज्येष्ठ पत्रकाराची बोबडी वळाली आणि घरात धूम ठोकली.नंतर या प्रकरणी सदर महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात प्रकाश भंडारे याच्याविरोधात रितसर तक्रार दिली.पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता विनयभंग,अॅट्रासिटी आणि नागरी हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि सायंकाळी अटक केली.अटक करतेवेळी सदर पत्रकाराच्या पार्श्वभागावर दंडुका मारला आणि लाथा-बुक्क्या मारल्या.त्यानंतर सदर पत्रकारांची मस्ती चांगलीच उतरली.
प्रत्येक पत्रकार परिषदेत हा ज्येष्ठ पत्रकार आमची पत्रकारिता अशी होती,असा उपदेश तरूण पत्रकारांना देत होता.त्यांची पत्रकारिता कशी होती,याचा उलघडा आता झाला आहे.एकंदरीत साठी बुध्दी नाठी झाली,असेच म्हणावे लागेल.असे तेजपाल शहरात आणि गावोगावांत आहेत,बेरक्याची त्याच्यावर नजर आहे.पुन्हा भेटू.