मुंबई - पत्रकारांच्या हक्कासाटी लढणाऱ्या पत्रकार हल्ला
विरोधी कृती समितीने संकिलत केलेल्या माहितीमध्ये पत्रकारांवरील
अन्याय-अत्याचाराच्या अनेक गोष्टी समोर आल्या असून पुरोगामीत्वाचा टेंभा
मिरविणाऱ्या महाराष्ट्रात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ संबोधल्या जाणाऱ्या
माध्यमांना काम करणे किती कठिण झाले आहे हे सप्रमाण सिध्द झाले
आहे.महाराष्ट्रात 2013 मध्ये दोन पत्रकारांच्या हत्त्या झाल्या आहेत,एका
महिला पत्रकारावर सामुहिक बलात्कार केला गेला आहे,चार
पत्रकार-छायाचित्रकारावर आत्महत्त्या करण्याची वेळ आली किंवा आणली गेली,तीन
पत्रकार तरूणपणीच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडले आहेत,राज्यात
71 पत्रकारांवर जीवघेणे शारीरिक हल्ले केले गेेले आहेत, तीन दैनिकांच्या
कार्यालयावर हल्ले केले गेले तर खंडणी,ऍट्रॉसिटी,विनयभंग आणि देशद्रोहाच्या
खटल्याना राज्यातील अनेक पत्रकारांना सामोरे जावे लागत आहे.पत्रकार हल्ला
विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी ही सारी माहिती आज एका
पत्रकाव्दारे प्रसिध्दीस दिली आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा पत्रकारांवरील
हल्लयाच्या घटनामध्ये वाढ झाल्याचे पत्रकात नमुद करण्यात आलं आहे.,अनेक
प्रकरणाची माहिती समितीपर्यत पोहचली नसल्याने हल्ल्याच्या घटनांची संख्या
दिसते त्यापेक्षा अधिक असल्याचेही पत्रकात स्पष्ट कऱण्यात आले आहे.
- पत्रकारांवरील हल्यांच्या घटनांमध्ये जगभर वाढ झाल्याची माहिती नुकतीच पॅरिस येथील ङ्गरिपोर्टर्स विदाऊट बॉर्डरङ्घ या संस्थेने प्रसिध्द केलेल्या आपल्या अहवालात दिली आहे.जगभरात चालू वर्षात 71 पत्रकारांच्या हत्त्या झाल्या आहेत,त्यात भारतातील 8 पत्रकारांच्या हत्त्यांचा समावेश आहे.छत्तीसगढ,जम्मू-काश्मीरमध्
ये पत्रकारांच्या हत्त्या आणि हल्ले जास्त
होत असले तरी विविध फंडे वापरून पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या
ङ्गकार्यात पुरोगामी महाराष्ट्र देखील मागे नाही हे वास्तव आकडेवारीवरून
समोर आलं आहे.महाराष्ट्रात वर्षभरात साधनाचे संपादक डॉ.नरेंद्र दाभोळकर
यांची 20 ऑगस्ट रोजी पुण्यात गोळ्या घालून हत्या कऱण्यात आली.त्यांच्या
मारेकऱ्यांचा चार महिन्यानंतरही ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले
नाही.जळगाव जिल्हयातील चाळीसगाव येथील पत्रकार नरेश सोनार यांची
दादर-अमृतसर एक्स्प्रेसमधून खाली फेकून 14 नोव्हेंबर रोजी निर्घृण हत्त्या
केली गेली . या प्रकरणातील आरोपी पकडले गेले आहेत.मुंबईमध्ये एका महिला
पत्रकारावर एका निर्जन ठिकाणी नेऊन सामुहिक बलात्कार केला गेला.या
प्रकरणातही आरोपी पकडले गेले.याची सुनावणी जलदगती न्यायालयामार्फत सुरू
आहे.
- राज्यात पत्रकारांवरील हल्लयाच्या घटनामध्ये सातत्यानं वाढ होत आहे.गेल्या वर्षी 62 पत्रकारांवर हल्ले केले गेले होते यंदा ही संख्या 71 पर्यत पोहचली आहे.अनेक ठिकाणी पत्रकारांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत.पूर्णा येथील पत्रकार दि ऩेश चौधरी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलीवर ऍसिड हल्ला केला गेल्याने साऱ्या महाराष्ट्रातील पत्रकारांचा थरकाप उडाला होता.त्याच्या निषेधार्थ पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने परभणीत भव्या मोर्चाही काढला होता.
पत्रकारांवरील हल्ल्याच्या अन्य घटनांमध्ये सातारा येथील विशाल कदम यांच्यावरील हल्ला,गंगाखेड येथील गंगाधर कांबळे,उमापूर येथील कृष्णा देशमुख,मुंबई येथील टीव्ही-9 चे चरण मरगम, ताडकळस येथील पत्रकार त्र्यंबक खंदारे आणि दोन दिवसांपूर्वीच हल्ला झालेले मदन अंभोरे,मुंबई येथील न्यूज नेशनचे सोनू कनोजिया आणि इम्रान यांना निलंबित उपायुक्ताकडून झालेली मारहाण,नेवासा फाटा येथील बाळासाहेब देवखिडे यांना पीआयकडून झालेली मारहाण,सोनपेेठ येथील सुधीर बिंदू यांच्यावर झालेला हल्ला,गंगाखेड येथील संजीव सुपेकर यांच्यावर हल्ला करून त्यांचे दोन्ही पाय निकामी केले गेले,इचलकरंजी येथील ज्येष्ट पत्रकार बाळ मकवाना याच्यावर आवाडे कॉग्रेसच्या लोकांनी हल्ला केला,माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील अऱविंद वाव्हळ यांच्यावर जीवघेणा हल्ला,पूर्णा येथील अनिल अहिरे,मंगळवेढा नजिकच्या दहिवड येथील प्रमोद बनसोडे,परभणीचे दिलीप बनकर,मुंबई येथील जय महाराष्ट्रचे विलास बढे,मुंबई येथील टीव्ही-9 चे रामराजे शिंदे,सागर कुळकर्णी,हदगाव येथील शिवाजी देशमुख,सातारा येथील रोहित बुधकर,उस्मानाबादचे शिवप्रसाद बियाणी,बीड जिल्हयातील चौसाळा येथील बळीराम बाजीराव राऊत,सेलू येथील दिलीप डासाळकर,आदि घटनांचा उल्लेख करावा लागेल.या घटनातील काही प्रकरणात चाकू कि वा अन्य तीक्ष्ण हत्त्यारांचा वापर केला गेला.यंदा पत्रकारांवरील हल्लयाच्या सर्वाधिक 11 घटना परभणी जिल्हयात घडल्या.त्या पाठोपाठ 7 प्रकार साताऱ्यात घडले आहेत.नागपूरपासून रत्नागिरी आणि नंदूरबारपासून लातूरपर्यत सर्वत्र पत्रकारांवरील हल्ल्याचे प्रकार घडले आहेत.अर्थातच ही आकडेवारी परिपूर्ण नाही.अनेक ठिकाणची माहिती समितीपर्यत आली नसल्याने हल्ल्याचा यापेक्षा जास्त घटना राज्यात घडल्या आहेत.
- फेब्रुवारीत नांदेड येथील गावकरीच्या कार्यालयावर हल्ला केला गेला,ऑगस्टमध्ये न गर येथील ए का दैनिकाच्या कार्यालयात एका आमदारपुत्राने गोंधळ घातला,ऑक्टोबरमध्ये वणी येथील पुण्यनगरीच्या कार्यालयावर हल्ला केला गेला.पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल कऱणे,त्यांना विविध प्रकारे छळ कऱणे असे प्रकार राज्यात सर्वत्रच घडले आहेत.गंगापूरचे जमिल पठाण यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली.ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनाही त्यांनी सकाळमध्ये लिहिलेल्या एका लेखामुळे काही धर्मांध शक्तींक डून धमक्या दिल्या गेल्या.विटा येथील पत्रकार विजय लोळे आणि सतीश भिंगे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचाङ्घ बंदोबस्तङ्घ करण्याचा प्रय़त्न झाला,लातूर येथील झी-न्यूजचे शशिकांत पाटील यांना धमकी,सोनपेठ येथील सय्यद कादिर,कृष्णा पिंगळे यांच्यावर पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल,आदित्या पोंचोलीची मुंबईतील झी न्यूजच्या महिला पत्रकारास असभ्या वागणूक,चंद्रपूर येथे एका पत्रकाराच्या विरोधात पोस्टरबाजी,कुत्रे अशा शब्दात उल्लेख,आळंदी येथेही विलास काटे यांच्याविरोधात नाहक पत्रकबाजी. असे अनेक प्रकार घडले आहेत.कधी बळाचा ,कधी कायद्याचा तर कधी झुंडशाहीचा वापर करून पत्रकारांना ङ्गअद्दलङ्घ घडविण्याचे अनेक प्रकार राज्यात घडले आहेत.विशेष म्हणजे हल्ले असोत किंवा धमक्या असोत हे केवळ बातम्या दिल्यामुळेच घडलेले आहे,याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असेही पत्रकात नमुद केले आहे.
म हाराष्ट्रात जेथे जेथे पत्रकारांवर हल्ले झाले तेथे तेथ संबंधित आरोपींवर किरकोळ कलमं लावली गेली,त्यामुळे आरोपींना लगेच जामिन मिळणे शक्य झाले.पुर्णेच्या ऍसिड हल्ला प्रकऱणात मुख्य आरोपी अनेक दिवस फरार असल्याचे दाखविले गेले,प्रत्यक्षात त्याचा सर्वत्र वावर होता.नंतर न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर तो पकडला गेला.तो शहर कॉग्रेसचा अध्यक्ष होता.जे हल्ले झाले किंवा जे धमक्याचे प्रकार घडले त्यातील आरोपी बहुतेक वेळा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यानंतर पोलिसांकडूनच पत्रकारांना त्रास देण्याच्या घटना घडल्या आहेत.त्यापाठोपाठ स्थानिक गुंडांनी पत्रकारांना मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत.राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडूनच पत्रकारांवर जास्त हल्ले झालेले असल्याने पत्रकार संरक्षण कायदा करून राज्यात माध्यमांना मुक्तपणे काम करता येईल असे वातावरण तयार होऊ देण्यात कोणताच पक्ष तयार नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाल ेआहे.
- पत्रकारांवरील हे हल्ले थांबवायचे असतील तर पत्रकारांवरील हल्ला हा अजामिनपात्र गुन्हा ठरवावा आणि पत्रकारांवरील हल्ल्याची प्रकरणं जलदगती न्यायालयामार्फत चालवावित या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने गेल्या तीन वर्षात तेरा वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली,दोन वेळा राष्ट्रपतींची भेट घेतली,प्रेस कौन्सिलचे चेअरमन न्या.मार्कन्डेय काटजू यांची दोन वेळा भेट घेतली,राज्याचे गृहमंत्री,विरोधी पक्ष नेेते, गट नेते याचंीही समितीने वारंवार भेट घेतली पण प्रत्ेयक वेळी आश्वासनं देऊनही कायद्याबाबत कोणताच नि र्णय घेतला गेला नाही.इचलकरंजीचे आमदार सुरेश हळणकर यांचे एक खाजगी विधेयक पडून आहे.ते चर्चेला येणार नाही याची काळजी घेतली जातेय.तरीही समितीचा लढा सुरूच आहे.8 मे रोजी पनवेल ते वर्षा अशी रॅली काढली गेली,16 नोव्हेंबरचा पत्रकार दिन काळा दिवस म्हणून पाळला गेला,नागपूर अधिवेशनात आठवण आंदोलन केलं गेलं. ग तवर्षी 12 आणि 13 डिसेंबर रोजी नागपुरात एस.एम.देशमुख आणि किरण नाईक यांनी आमरण उपोषण केलं,बीड आणि परभणी येथे पत्रकारांचे मोर्चे काढले गेले,2 ऑक्टोबर रोजी पुण्यात पत्रकारांचा भव्य मोर्चा काढला गेला,अन्य मार्गानेही समिती पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी लावून धरत असल्यााचेही समितीच्या पत्रकार नमुद कऱण्यात आले आहे.महाराष्ट्रात पत्रकार सुरक्षा कायदा आणि पेन्शची मागणी समितीने केल्यानंतर अन्य राज्यातूनही अशा प्रकारच्या मागण्या पत्रकार संघटना करू लागल्या आहेत समितीच्या कार्याची ही मोठी उपलब्धी आहे असे समितीला वाटते.सततच्या पाठपुराव्यामुळे ज्या पध्दतीने लोकपाल आले,जादूटोणा विरोधा कायदा केला गेला त्याच प्रमाणे एक दिवस सरकारला पत्रकार संरक्षण कायदा करावाच लागेल असा विश्वास एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला. हा कायदा होईपर्यत राज्यातील ज्येष्ट पत्रकारांना निवृत्तीवेतन मिळेपर्यत समिती सनदशीर मार्गाने आपला लढा चालूच ठेवणार असल्याचेही देशमुख ायंनी स्पष्ट केले आहे.