सोमवार दि. 9 डिसेंबर रोजी पुढारीचे पत्रकार अनिल देशमुख यांची कोल्हापूर प्रेस क्लब
च्या अध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली.तर उपाध्यक्ष पदावर बी-न्यूज च्या बाळासाहेब
कोळेकर यांची निवड झाली. मात्र या निवडीतून कोल्हापूर प्रेस क्लब चे सर्वेसर्वा
समझणारे दैनिक महाराष्ट्र टाइम्स चे मुख्य प्रतिनिधी गुरुबाळ माळी आणि त्यांचे परम
मित्र दैनिक लोकमत चे मुख्यप्रतिनिधी विश्वास पाटील हे चांगलेच तोंडावर
आपटले.त्यांनी आयत्यावेळी इतर दैनिकांच्या कोट्यातून आलेल्या दैनिक केसरीचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विजय पवार यांना
शब्द देवून सुद्धा निवडणूक रिंगणातून माघार घ्यायला सांगून त्यांचा पोपट केला आणि
नांगी टाकली.
तर दुसरीकडे दैनिक सकाळ च्या सुधाकर काशीद यांच्या गत दोन वर्षापूर्वी
प्रेस क्लब च्याच निवडणुकीत झालेल्या अपमानाचा बदला घेण्यात सकाळ चे पत्रकार
लुमाकांत नलवडे आणि सुनील पाटील हे यशस्वी झाले.परंतु त्यांची ही खेळी मात्र इतर
कोणाच्याही लक्ष्यात आली नसल्याने उर्वरित प्रेस क्लब सदस्यांनी सुद्धा नलवडे आणि
सुनील पाटील हे ठरवतील त्यावर विश्वास ठेवत निवडणूक प्रक्रिया पार पाडली खरी.परंतु
आता दैनिक पुढारी आणि दैनिक सकाळ या दोन पारंपारिक शत्रूंच्या लढाईत कोल्हापूरच्या
पत्रकारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी स्थापन झालेली प्रेस क्लब बंद तर पडणार
नाही ना अशी शंका येवू लागली आहे.
आता गुरुबाळ माळी आणि विश्वास
पाटील यांची जागा सुनील पाटील आणि लुमाकांत नलवडे यांनी घेतली असून ते ठरवतील ती
पूर्व दिशा अशी अवस्था होणार आहे.त्यामुळे मात्र कोणतेही पद न देता इतर छोट्या
दैनिकांवर फार मोठा अन्याय करण्याचे पातक या दोघांनी केले आहे अशी चर्चा
कोल्हापुरातील पत्रकारांमध्ये सध्या सुरु आहे.