कोल्हापूरच्या भाऊसिंगजी रोडवरचा
पद्मश्री आखाडा तसा लोकप्रिय. काही दिवसापूर्वी या आखाड्यात राजारामपुरी
केसरी दिलीप लोंढे आणि भवानी मंडप केसरी वस्ताद सुरेश पवार यांची खडाखडी
रंगली होती. लोंढे हे कार्यकारी तर पवार हे वरिष्ठ कार्यकारी. पै. लोंढे
यांनी निवृत्ती पत्करली आणि प्रेस लाईनला मजकूर निवडीची जबाबदारी वस्ताद
पवारांवर आली. आता गम्मत अशी कि राजारामपुरी केसरी पै लोंढे हे दादांच्या
आग्रहास्तव पुन्हा आखाड्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे कुस्ती रंगणार अशी
चर्चा अक्क्ख्या करवीरात सुरु आहे. या दोन मल्लांच्या कुस्तीत व्हिजन
मार्गे पुढारीत आलेले मुकुंद फडके यांची चांगलीच गोची झाली आहे.
......................................................
पत्रकारांच्या सल्ल्याने भले भले भंगारात गेले. पण एका भल्या राजकारण्याने पत्रकारांना चक्क भंगार वाल्यांच्या पंक्तीत वाढून धमाल उडवून दिली... त्याची सांगलीत घडलेली हि गोष्ट. सांगलीत भाजपकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या एका नेत्याने पत्रकार परिषद बोलावली. हा नेता तसा सज्जन. सज्जन नेत्याकडे कार्यकर्ते तसे नसतातच. याच्याकडेही नव्हते. पत्रकारांना कार्यकर्ते कुठून दाखवणार??? म्हणून या नेत्याने शक्कल लढवली. त्याने चक्क आपल्या भागातल्या भंगारवाल्यांना जेवणाचे निमंत्रण दिले. आणि हेच माझे कार्यकर्ते अशी थाप ठोकून दिली. पत्रकरनहि ते खरे वाटले. परिषद संपली. जेवणे आली. मग गप्पा सुरु झाल्या. "तुमच भंगाराच दुकान कुठे आहे'' अशी विचारणा काही भंगारवाल्यांनी पत्रकारांना केली. आणि सगळा उलगडा झाला. पत्रकार ज्यांना कार्यकर्ते समाजात होते ते भंगार वाले निघाले आणि भंगारवाले ज्यांना भंगारवाले समजत होते ते पत्रकार निघाले. कसेबसे हात पुसत निघायची वेळ पत्रकारावर आली.
...............................