काही दिवसांपूर्वी लोकमतला ७ फेब्रुवारीला अमरावती शहरात पाण्याचा सुकाळ अशी बातमी छापुन आली. त्यानंतर २२ फेब्रुवारीला बोअर खोदण्यासाठी कलेक्टरची परवानगी जरुरी अशी बातमी छापली. त्यामुळे अमरावतीत मुबलक पाणी आहे कि पाण्याची कमतरता हा पेच लोकमतनेच निर्माण केला आहे. बातम्यांची कामे सोडून कार्यालय प्रमुख एका पोलिस अधिका-यांसोबत त्यांच्या एसी केबिन मध्ये बसून राहतील तर असच होणार.या अधिक-याची काही दिवसापूर्वी बदली झाली. साहेबांची बदली रद्द करण्यासाठी मोर्चा काढा असा दबाव या कार्यालय प्रमुखाने 'हेल्पलाइन' नावाच्या एका संघटनेवर टाकला. पोलिसाच्या बदली रद्दसाठी मोर्चा आणि त्यासाठीही पत्रकाराचा दबाव म्हणून हेल्पलाइनने मोर्चा काढला. नाईलाजाने पण मोर्चात फक्त १५ जण सामील झालेत. बातम्या सोडून ही कामे यांना बाबूजी सांगतात काय?