पत्रकारांचे आद्य गुरू नारद होते.त्यांचा आशिर्वाद घेवून दि.२१ मार्च २०११ रोजी बेरक्या हा ब्लॉग आम्ही सुरू केला.हा ब्लॉग सुरू करताना,डोक्यात एकच होते,मीडियातील घाण साफ करायची.पण घाण साफ करता करता नाकी नऊ आले तरी घाण संपलेली नाही.मात्र पाणी सोडून सोडून दुर्गंधी कमी केली आहे.
ऐवढेच नाही तर पत्रकारांच्या सुख आणि दु:खात बेरक्या धावून आलेला आहे.ज्यांनी अन्याय केला त्यांच्यावर तुटून पडलेला आहे.चांगल्या पत्रकारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे.
बेरक्या ब्लॉगने (जुन्या आणि नव्या)केवळ तीन वर्षात ११ लाख हिटस् चा टप्पा पार केलेला आहे.हा मराठी ब्लॉग विश्वात इतिहास आहे.हा खराखुरा आकडा आहे.बोगसगिरी नाही.एका युजर्सने दिवसांतून कितीही वेळा ब्लॉगला भेट दिली तरी २४ तासात एकच आय.पी.अॅड्रेस ग्राह्य धरून केवळ एक आकडा पडतो.तसेच मोबाईलवर वाचलेली आकडेवारी ग्राह्य धरली जात नाही.बेरक्या ब्लॉगला किमान दर दिवशी किमान १० हजार लोक भेट देतात,हे सिध्द आहे.
हा ब्लॉग केवळ पत्रकारच वाचत नाही तर वृत्तपत्रांतील सर्व कर्मचारी,पत्रकारितेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी,जर्नालिझम कॉलेजमधील कर्मचारी, शासकीय अधिकारी,कर्मचारी,राजकीय नेते,कार्यकर्त,सामाजिक कार्यकर्ते,पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे सर्वजण आवडीने वाचतात.त्यामुळे मोठ्या वृत्तपत्र आणि चॅनलच्या मालकांना सुध्दा बेरक्याची दखल घ्यावी लागत आहे.
बेरक्या ब्लॉग संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोप-यात लोकप्रिय झाला आहे.ऐवढेच नाही तर देशभरात राहणारे मराठी बांधवही हा ब्लॉग आवडीने वाचतात.मात्र आम्ही कधीही गर्वाने फुगलो नाही की कधी माज केला नाही.आम्ही सदैव विनम्र आहोत आणि विनम्रच राहू.
बेरक्याने नुसत्या पत्रकारितेतील घडामोडी दिलेल्या नसून,या क्षेत्रात काय नविन आले,काय बदल होत आहेत,नविन कोणते वृत्तपत्र आणि चॅनल येत आहे,याची माहिती करून दिली.त्यामुळे अनेकांना जॉब मिळाला.
बेरक्यामुळे अनेकांना न्याय मिळालेला आहे.बेरक्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या असल्या तरी बेरक्या व्यक्तीविरूध्द नाही तर प्रवृत्तीविरूध्द आहे,हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिले.बेरक्या मालकांच्या विरोधात कधीच नाही.मालकांनी बेरक्याची भूमिका समजावून घ्यावी,अशी अपेक्षा आहे.
बेरक्याने रात्रंदिवस मेहनत करून तब्बल तीन वर्षे हा ब्लॉग चालविला.हा ब्लॉग चालवित असताना आम्हाला ब-याच वेळी अडचणी आल्या पण या सर्व अडचणीवर मात करून,ही चळवळ जिवंत ठेवली आहे.
बेरक्या ब्लॉग बंद करण्यासाठी काही शत्रुंनी जोरदार प्रयत्न केले,पण त्यांना आम्ही पुरून उरलो आहोत.बेरक्या हा पत्रकारांचा पाठीराखा आहे.त्यामुळे वाईट प्रवृत्तींनी आमच्यात कितीही काटे अंथरले तरी ते काटे दूर करून अखंडीत चालत राहू.
अनेकजण विचारतात,तुम्हाला याचा फायदा काय ? उत्तर एकच आहे ...
ज्या फिल्डमध्ये आम्ही जगलो,ते फिल्ड आरश्यासारखे स्वच्छ असावे,ऐवढीच आमची इच्छा आहे.बाकी आमचा काहीही स्वार्थ नाही.आपल्या बांधवांना आपल्या क्षेत्रात काय चालू आहे,काय नविन येत आहे,याची माहिती देण्यासाठी ही एक चळवळ आहे.त्यामुळे वळवळ करणा-यांच्या मुसक्या नक्कीच आवळू.
बस्स तुमचा आशिर्वाद,तुमचे प्रेम आणि सहकार्य हवे आहे,बाकी काही नको.
आपला सहकारी
बेरक्या