"वेळ प्रत्येकाची येते आणि जेव्हा ती येते तेव्हा ती प्रत्येकाला पद्धतशीरपणे घेते" आज अशीच काहीशी परिस्थिती आज पुढारी समूहाच्या जाधव कुटुंबाची झाली आहे. पुढारी नावाचा वृत्तसमूह.. ज्याची सुरुवात पद्मश्री ग.गो.जाधव यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला बळ देण्यासाठी आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी या केली होती. परंतु काळाच्या ओघात पुढे या समूहाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रतापराव जाधव आणि कंपनीने सर्व नीती मूल्ये बाजूला ठेवून या वृत्त समूहाला प्रोफेशनल "मनी मेकिंग मशीन" बनवले. ज्या कार्यकर्त्याना तुम्ही आपल्या सुनेला निवडून आणावे म्हणून विनंती करत आहात त्याच कार्यकर्त्यांना लोकसभा- विधानसभा - नगरपालिका - जिल्हा परिषद अशा सर्व निवडणुकांमध्ये आपल्या वृत्त समूहाच्या विविध वसुली एजंटामार्फत करोडो रुपयांचे पॅकेज घ्यायला लावले आहे, तेव्हा कुठे तुम्ही त्यांच्या चांगल्या चार ओळी छापल्या आहेत. पुणे शहरात तर तुमचा पांडू वसुलीवाला तुमच्याही पुढे जाऊन प्युअर दलालीचे काम करतो. लोकसभेला विधानसभेला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून पैसे घेऊन जो जास्त पैसे देईल त्याच्या चरणी याची निष्ठा असते. म्हणजे "दलाली तर दलाली वरून गद्दारी आणि नाव पुढारी" असा सगळा आपल्या वृत्त समूहाचा प्रवास सुरू असताना आपण एका कार्यकर्त्याकडून अशी कशी अपेक्षा करता की त्यांनी निस्वार्थ भावनेने माझ्या सुनेला निवडून द्यावे. सत्तेच्या सारीपाठात एखाद्या क्रूर माणसाला जितकी जास्त ताकद मिळते,तो जास्त वर जातो तितका तो आणखी क्रूर होत जातो, असा हिटलर पासून इतिहास आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला जर यश मिळाले तर आपण पुढील काळात आपला हा पॅकेज बातमीचा धंदा थांबवणार की या सत्तेच्या बळावर आणखी जोरात आमचा गळा आवळणार..? असा प्रश्न माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना पडला आहे. शेवटी आमच्या निवडणुकीच्या वेळेस आमचे केलेले हाल आम्ही कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे आपल्या निवडणुकीचे सध्या तरी मला अवघडच दिसते. All the best 👍 - आपला रवि धंगेकर.
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 18, 2026

0 टिप्पण्या