‘बेरक्या’चा कर्ताधर्ता नेमका कोण? २०११ पासून मीडिया जगतात खळबळ माजवणाऱ्या ‘त्या’ चेहऱ्याचा अखेर पर्दाफाश!

 


मुंबई: गेली कित्येक वर्षे मराठी वृत्तपत्र, टीव्ही मीडिया आणि डिजिटल विश्वात एकच नाव चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले—ते म्हणजे ‘बेरक्या’!

वृत्तपत्रांच्या कार्यालयात आत काय शिजतंय, कोणत्या चॅनेलमधून कोणाची विकेट पडणार, कोणाची बदली होणार आणि कुणाचे 'उद्योग' काय सुरू आहेत, याची खडान्‌खडा माहिती चव्हाट्यावर आणणारा ‘बेरक्या ब्लॉग’ माहीत नाही, असा मराठी पत्रकार शोधूनही सापडणार नाही. सन २०११ मध्ये सुरू झालेल्या या ब्लॉगने गेल्या दशकभरात अनेकांची झोप उडवली, काहींचे बुरखे फाडले, तर संपूर्ण माध्यम जगतात अक्षरशः थरकाप उडवला.

पण गेल्या १३-१४ वर्षांपासून पत्रकारांना आणि वाचकांना छळणारा एकच यक्षप्रश्न कायम राहिला—

"हा बेरक्या नेमका कोण चालवतो? या पडद्यामागचा खरा 'जनक' कोण?"

कुणी म्हणे हा मुंबईतला बडा संपादक आहे, तर कुणी म्हणे पुण्यातल्या पत्रकारांची ही गँग आहे. अफवांचे पेव फुटले, संशयाची सुई अनेकांवर फिरली, पण ‘बेरक्या’चा खरा चेहरा मात्र कायम गूढच राहिला.

आता अखेर सस्पेन्स संपला आहे!

‘बेरक्या ब्लॉग’चा जन्म कसा झाला? पडद्यामागे सूत्रे हलवणारा तो अदृश्य हात कोणाचा? आणि इतकी वर्षे गुप्त राहून मीडियाची पोलखोल करण्याचे धाडस कुणाचे होते? या सगळ्याचा संपूर्ण आणि स्फोटक उलगडा आता थेट एका विशेष व्हिडिओतून समोर येत आहे.

मीडिया जगतातील सर्वात मोठे गुपित उलगडणारा हा व्हिडिओ चुकूनही चुकवू नका—हा व्हिडिओ नक्की पाहा!

मुद्याचं बोला चॅनल - सुनील ढेपे पॉडकास्ट मुलाखत



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या