भाऊ तोरसेकर - श्वेता शालिनी वादात 'भावड्या' उताणा पडला ...


आज आम्ही तुम्हाला श्वेता शालिनी आणि भाऊ तोरसेकरांच्या खडाष्टकाची गोष्ट सांगणार आहोत.हे खडाष्टक वाजले आणि मिटलेही.फडणवीसांनी त्यावर मम् आत्मना : श्रुती भूर्ति म्हणत वादाला तिलांजली दिली.पण पूजा आटोपली तरी धुपाचा धूर आणि वास संगच दरवळत राहातो तसे श्वेता शालिनी आणि भाऊ तोरसेकरांचे खडाष्टक चर्चेत आहे.

तसा भाऊ तोरसकर म्हणजे धच्चोट टिनपाट टमरेलछाप माणूस.दरवेशाचं माकड.श्वेता शालिनी म्हणजे कोट्याधीश उच्चशिक्षित सप्ततारांकित सेलिब्रेटी,बिजनेसवुमन प्लस राजकारणी.अमित शहांच्या खास मर्जी आणि विश्वासाची बाई.महाराष्ट्राची भाजप मीडिया सेल प्रमुख.तिच्या पुढे या दीड दमडीच्या छटाक भावड्याची काय मातब्बरी.दिले असतील.  अमित शहांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान तिच्याकडे पाचशे पन्नास कोटी.नसतील खर्चीले तिने.किंवा भावड्याला दिले नाहीत.म्हणून काय याने तिला पराभवाला जबाबदार धरायचे ? हा कोण टिकोजीराव तिला हिशोब विचारणारा ? तिने पाचशे पन्नास कोटीचे काय केले ? आम्हाला तर पोहचले नाहीत.मग कोणाकोणाला वाटले ? ज्यांना वाटले त्यांनी पक्षासाठी काय केले ? आम्ही तीन महिने खुंटावर बसून आतडी लोंबून आकडी वळेपर्यंत कोकललो,आमच्या वाट्याला छदाम नाही.हे कसे ? यावर श्वेता शालिनीने भावड्याला चक्क अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली.

ती पाहून भावड्याची इजारच पिवळी झाली.दोन कोटी ! भावड्याचे डोळेच गरगरले.म्हणजे समजा खटला चालला.आरोप सिद्ध झाला आणि कोर्टाने अब्रुनुकसानीची दोन कोटीची रक्कम द्यायला सांगितली तर ती फेडणार कशी ? भावड्याच्या स्वतःच्या गोवऱ्या तर केव्हाच मसणात गेल्यात.टीबीझाल्यागत धापा देत,खाकरत खोकरत युट्युबवर प्रतिपक्ष चालवतो.मोदी भाजप आणि फडणवीसांच्या आरत्या गातो.त्याबद्दल चारपैसे मिळतात.त्यावर दिनमान भागते.थोडक्यात खांडुक.कशाला उंटिणीचा मुका घ्यायचा ? तिने मारली लाथ.पडला उताणा.अखेर फडणवीसांनी वाद मिटवला.पेटवणारा तोच अन विझवणाराही तोच.

समुद्रतुभ्यम अर्थात पाणउतारा

भाऊ तोरसेकर म्हणजे तसे ज्येष्ठ पत्रकार.कधीकाळी ते आचार्य अत्र्यांच्या दैनिक मराठा मध्ये होते म्हणे.नंतर त्यांनी बरीच मुलुखगिरी केली.साप्ताहिके मासिके पाक्षिके दैनिके अशा अनेक ठिकाणी भाडोत्री कलमबहाद्दरी केली.टाकसाळ थोडक्यात.विवीध विषयावर.मागणी तसा पुरवठा हा त्यांचा खाक्या.तसे भाऊ कट्टर संघाचे.पण पोटासाठी काटे सरोटे काहीही चालतं त्यांना.एका 'मिक्सरबाज पेपर'साठी त्यांनी एकदा मुंबईतल्या अंडरवर्ल्ड डॉनवर चरित्रलेख मालिका देखील लिहीली होती.यावरुन त्यांची वैचारिक पातळी लक्षात यावी.तर असे हे भाऊ तोरसेकर.आजकाल ते स्वतः चे युट्यूब चालवतात.अर्थात पोटार्थीच.म्हणायला समाज प्रबोधन,चिंतन वगैरे.पण ते काही खरे नाही.बहुतेकांना त्यांची ओळख भाजपच्या दावणीला बांधलेला एक भुक्कड जख्खड आशाळभूत लाळघोट्या संघोटा अशीच आहे.

त्यांच्या युट्यूबचे नाव आहे प्रतिपक्ष.पण ते निष्पक्ष नाही.भाजपचे गुणगान करणे,तोंडाला फेस येईस्तोवर मोदींच्या आरत्या उतारणे आणि कौंग्रेसला येथेच्छ गालीप्रदान करणे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम.त्याचे त्यांना बऱ्यापैकी पैसे मिळतात म्हणे.(च्यायला आजकाल कोण कशात काय कमवील काही सांगता येत नाही ) असे आणखीही काही भाजपभक्त युट्यूब पत्रकार आपल्याकडे आहेत.जे लाजलज्जा खुंटीवर टांगून,फडणवीस कृपेकरुन आपल्या युट्यूब पत्रकारितेचे दुकान चालवतात.इथे विषय भाऊ तोरसेकरांचा आहे.त्यामुळे मुळ झाडाबद्दल बोलू. इतर काकु बांडगुळांची चर्चा इथे कशाला? हां तर विषय असा घडला की हे जे भाऊ तोरसेकर आहेत.त्यांना श्वेता शालीनी नावाच्या एका विदूषीने परवा एक नोटीस पाठवली.अब्रुनुकसानीची लिगल नोटीस.भानगड काय तर भाऊ तोरसेकरांनी एके दिवशी त्यांच्या प्रतिपक्ष या युट्यूब चॅनलवर या श्वेता शालीनीबाईची येथेच्छ धुलाई केली.थोडक्यात वस्त्रहरणच.कारण काय ; तर तीने म्हणे पक्षाने (भाजपने) तिच्याकडे पत्रकारांना वाटण्यासाठी म्हणून दिलेले पैसे तिने नीट वाटले नाहीत.

जिकडे वाटायचे तिकडे सोडून भलतीकडेच वळवले.ज्यांनी (म्हणजे भावड्या,काकु वगैरे ) पक्षासाठी काम केले त्यांना दिले नाहीत.थोडक्यात भाऊ तोरसेकरांना त्यांची दक्षिणा मिळाली नाही म्हणून त्यांनी त्रागा केला.आपल्या प्रतिपक्षात ते श्वेताबाई बद्दल बरेच काहीबाही बरळले.भावड्याचं सध्या चित्त थाऱ्यावर नाही.आधीच भाजपला लोकसभेत बसलेल्या फटक्याचा क्लेश.त्यात या श्वेता शालीनीने पैसे बुडवले.त्याची तणतण त्यांनी युट्यूबवर जाहीरपणे काढली.झाले तेवढ्यावरुन शालीनीबाईने भाऊंना अब्रुनुकसानीची नोटीस बजावली.थोडी थीडकी नव्हे,पाच कोटींची! ती पाहून भाऊंची तंतरलीच.आत्माक्षोभ झाला तो वेगळाच.हे म्हणजे समुद्रतुभ्यमच.बोली मराठीत पाणउतारा.  

भावड्याचं गणित

म्हणजे एकतर या वयात (८४वयोमान) पोटतिडकीने घसा खरवडून पत्रकारीतेचे सगळे तत्व मूल्य सिद्धांत गुंडाळून पक्षाहीतासाठी समर्थनार्थ रेटून बोलायचे.त्याबद्दल ऋण धन्यवाद राहीले बाजूला.निदान रोजंदारी तरी द्यायची.ती दिली नाही.त्यावर ओरड केली तर अब्रूनुकसानीची नोटीस.ती ही तब्बल पाच कोटींची! बरे पक्षाची नाही वैयक्तिक.श्वेता शालीनी! कोण ही श्वेता शालीनी ? भाऊ तोरसेकर आणि तिच्यात नेमकं काय आणि कशावरून वाजलं? दोघांतील वाद अखेर देवेंद्र फडणवीसांनी मिटवला‌ म्हणतात.म्हणजे श्वेता शालीनीने भाऊ तोरसेकरांना पाठवलेली नोटीस मागें घेतली.भाऊ तोरसेकरांच्या जीवात जीव आला.पण एवढे असे काय घडले होते की ज्यामुळे भाऊ तोरसेकर आपल्या युट्यूबरुन श्वेता शालीनीवर घसरले.त्यावरुन श्वेता शालीनी नागिणीसारखी चवताळून उठली.बरे झाले फडणवीसांनी चपळाईने मध्यस्थी करुन पुंगी वाजवली, आणि नागिण टोपलीत घातली.नाही तर बाईने बुवाचा जीवच घेतला असता.

ही सगळी भानगड नेमकी  काय ते समजून घ्या.विषय इंटरेस्टिंग आहे.भाऊ तोरसेकर कोण काय ते आधीच सांगीतले.आता श्वेता शालीनी कोण ते समजून घ्या.ही बाई दिसते तशी आणि वाटते तेवढी साधी भोळी सरळ वगैरे नाही.एकतर ती स्वतः कोट्याधीश आहे.मुंबईचे पहिले महापौर नाना पालखीवाला यांची पणती.ती भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र मिडियासेल प्रमुख आहे.कधीकळी प्रवक्ता देखील होती.विधानपरिषदेतून आमदारकी, इतकेच नाही तर राज्यसभेत खासदारकीवर तिचा क्लेम आहे.अमीत शहांची विश्वासू.आता अशा या महामायेशी भाऊ तोरसेकराने पंगा घेतला.पक्षाने लोकसभा निवडणुकीत पत्रकार वाटण्यासाठी तिच्याकडे दिलेली रक्कम तिने वाटलीच नाही.आम्ही पक्षासाठी रक्त ओकले.मात्र आम्हाला छदाम देखील दिला नाही.हा भाऊंचा प्रतिपक्ष.बरे भाऊंनी आकडाही सांगून टाकला.पाचशे पन्नास कोटी! हा आकडा भाऊंना कोणी सांगितला ? ( बहूतेक मुनगंटीवार किंवा चंद्रकांत पाटलांनी) बरे भाऊंचे तोंड त्यादिवशी नेहमीपेक्षा जरा जास्तच सुटले.त्यात फडणवीसांच्या सरबराईच्या भरात त्यांनी पक्षाचाच टवका काढला.आता हे पाचशे पन्नास कोटींचे प्रकरण दडपायचे कसे ? म्हणून मग हे नोटीस समज मांडवली असा सगळा प्रपंच.तो झाला.बहूतेक भाऊंना दक्षिणा मिळाली.पण त्या पाचशे पन्नास कोटींचे काय ? म्हणजे भाजपच्या महाराष्ट्रातील पराभवाचे हेही आणखी एक कारण आहे की काय ?  

- रवींद्र तहकिक 

छत्रपती संभाजीनगर 

मो. ७८८८०३०४७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या