छत्रपती संभाजीनगर: येथील ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड यांनी सुरू केलेल्या 'न्यूज यात्रा' या युट्यूब चॅनलला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आपल्या २५ वर्षांच्या पत्रकारितेच्या अनुभवातून राजकीय आणि सामाजिक विषयांवर ते अभ्यासपूर्ण व्हिडीओ सादर करत आहेत.
संजय वरकड यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी दैनिक 'सकाळ'मध्ये अडीच वर्षे बातमीदार आणि साडेसात वर्षे मुख्य बातमीदार म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर 'आयबीएन लोकमत' या वृत्तवाहिनीमध्ये त्यांनी मराठवाडा ब्युरो चिफ म्हणून पाच वर्षे महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली. पुढे नऊ वर्षे सकाळमध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम करत त्यांनी आपल्या अनुभवाची छाप पाडली.
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील २५ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर, वरकड यांनी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर स्वतःचे 'न्यूज यात्रा' हे युट्यूब चॅनल सुरू केले. या चॅनलच्या माध्यमातून ते विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर आधारित विश्लेषणात्मक व्हिडीओ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या या नव्या प्रवासाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
0 टिप्पण्या