लोकमत अमरावती एडिशनच्या हालचाली सुरु

लोकमतच्या अमरावती एडिशनच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सध्या अमरावतीची छपाई नागपूर येथून होत आहे. अमरावती येथे प्रिंटींग युनिट सुरु झाल्यावर अमरावती, वर्धा, यवतमाळ या तीन ठिकाणची छपाई अमरावतीलाच होणार आहे. शहर एडिशननंतर आता दिव्य मराठी लवकरच अमरावती विभागात ग्रामीण अंक सुरु करणार आहे. त्याला तोड देण्यासाठी लोकमत अमरावती छपाई सुरु करणार आहे. दिव्य नागपुरात आल्यास त्याला टक्कर देण्यासाठी छपाईचा ताण कमी व्हावा म्हणून हे सुरु आहे.
इतकेच नाही तर कधी न कधी दिव्य अमरावतीतून छपाई सुरु करेल हि बाब लोकमतला कळली आहे. त्यामुळे दिव्यचे चांगले लोक आधीच ओढून घेण्याची तयारीहि लोकमतने सुरु केली आहे. त्यासाठी लोकमतने दिव्यच्या चांगल्या रिपोर्टरची यादी तयार केली आहे. त्यात यवतमाळचे बालाजी देवार्जनकर, अश्विन सवालाखे, वर्धाचे महेश मुंजेवार, अमरावतीतून अनुप गाडगे, प्रेमदास वाडकर, प्रसन्न जकाते, मनीष जगताप यांची नावे आहेत. लोकमत अमरावतीची जबाबदारी सहाय्यक संपादक गजानन जानभोर यांच्याकडे येऊ शकते. चांगले लोक घेण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी लोकमत करत आहे. प्रसंगी लोकमतची अमरावती एडिशन सगळ्यात जास्त पगार देणारी एडिशनहि असू शकते.