'दिव्य मराठी'विरोधात जळगावच्या सहाय्यक कामगार आयुक्ताकडे पुन्हा तक्रार

'दिव्य मराठी'च्या विरोधात जळगावच्या सहाय्यक कामगार आयुक्तांकडे पुन्हा एक तक्रार दाखल झाली आहे. आज, 20 जून रोजी टेलिफोन ऑपरेटर चेतना वामन चव्हाण  (9923728593) हिने ही तक्रार दाखल केली आहे. असिस्टन्ट एच आर मॅनेजर राजवंती काैर आणि अॅडमिन एक्झीक्युटीव्ह प्रमोद वाघ यांच्याविरोधात ही तक्रार आहे.
तक्रारीनुसार, काैर व वाघ हे दोघेही चेतना चव्हाण हिला त्रास देवून तिचा छळ करीत आहेत. आपल्या मर्जीतील, नातेवाईक उमेदवाराची संबंधित पदावर वर्णी लावून घेण्यासाठी प्रमोद वाघ हे राजवंती काैर हिच्या मदतीने राजीनामा द्यावा म्हणून चेतना चव्हाण हिच्यावर दबाव आणीत आहेत, धमक्या देत आहेत. राजीनामा दिला नाही तर करिअर उद्ध्वस्त करु, टर्मिनेट करु, दूरवर बदली करु; अशा धमक्या तिला दिल्या जात आहेत. तिला काम करण्यापासून रोखले जात आहे व कामावर येवू नको; आलीस तर सुरक्षारक्षकाकडून धक्के मारून बाहेर काढू, अशा अमानवीय पद्धतीने अपमानित केले जात आहे.
चेतना चव्हाण हिच्याकडे छळाचे व धमक्यांचे बरेचसे डिजीटल रेकॉर्डेड पुरावे आहेत. ती महिला हक्क संरक्षण समिती, राज्य महिला आयोग; तसेच मानवी हक्क आयोगाकडेही दाद मागणार आहे. यापुढेही 'दिव्य मराठी'च्या एचआर विभागाकडून काम करण्यापासून रोखले गेले किंवा राजीनाम्यासाठी दबाव, धमक्या सुरू राहिल्या तर राजवंती काैर व प्रमोद वाघ यांच्याविरोधात पोलिसांत फाैजदारी गुन्हा दाखल करण्याचीही चेतना चव्हाण हिची तयारी आहे.