'इंडिया टीव्ही'च्या तनु शर्मा यांचा कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न

'इंडिया टीव्ही'च्या तनु शर्मा हिने कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने काहीतरी आैषध-गोळ्या घेतल्या होत्या. अगोदर सहकारी वर्गाने तिच्या आत्महत्येच्या धमकीकडे गंभीरपणे लक्ष दिले नाही. नंतर तिला जानकबाद कार्यालयाच्या गेटवर जेव्हा रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या तेव्हा सुरक्षारक्षकाने वरिष्ठांना हा प्रकार कळविला. त्यानंतर खळबळ माजली. तनू शर्माला तातडीने चॅनलच्या गाडीतून तात्काळ कैलास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तिला लवकर स्वास्थ्य लाभो; हीच 'बेरक्या'ची प्रार्थना. इश्वर तिला नंतर सत्य सांगण्याची ताकद देवो.
तनु शर्माने आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी 'फेसबुक'वर स्टेट्स अपडेट केले होते. ते असे -
"सर्वांना अखेरचा गुडबाय. मी आत्महत्या करीत आहे. इंडिया टीव्हीचे प्रशांत एमएन, अनिता शर्मा आणि रितू धवन यांना धन्यवाद. मी खूप मजबूत आहे; पण आता मजबूर झालीय. इंडिया टीव्हीने माझ्याबाबत जे केलेय ते भयानक आहे. प्रसाद सरांनी माझे जीवन उद्ध्वस्त केलेय. अनिता शर्मासाठी तर शब्द नाहीत. एक महिला असून ती अशी वागू शकते? भयानक षडयंत्री, विश्वासघातकी आहेत हे लोक. मृत्यूनंतरही मला इंडिया टीव्ही जॉईन केल्याचा पश्चाताप राहील!"