महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या वसुली अधिका-यांची वार्ताहराकडून धुलाई

महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या नांदेड आवृत्तीचा वर्धापन दिन जवळ आला आहे.यानिमित्त नांदेड,परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील वार्ताहरांची बैठक काल शनिवार दि.१४ जून रोजी नांदेडात पार पडली.यावेळी जवळपास १०० वार्ताहर उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक वार्ताहरास जाहिरातीचे टार्गेट देण्यात आले.नंतर जाहिरात वसुलीचा विषय निघाला.यावेळी परभणी जिल्ह्यातील एक वार्ताहर उभा राहिलाअसता वसुली अधिका-यांने त्यास दोन हजार रूपये वसुली केव्हा भरणार म्हणून विचारले.तेव्हा तो म्हणाला,सर मी लाखो रूपये भरले,आता दोन हजार रूपये तर राहिले आहेत,लवकरच भरतो म्हणून सांगितले.पण हा वसुली अधिकारी म्हणाला,लवकर म्हणजे कधी ? तेव्हा तो वार्ताहर म्हणाला,भरतो लवकरच...पण हा हरामखोर वसुली अधिकारी म्हणाला,त्यात काय...बायकोला पाठवायचे आणि दोन हजार रूपये मिळवायचे,आणि तेच भरायचे...
वसुली अधिका-याचे हे वाक्य ऐकताच वातावरण गरम झाले.यावेळी तो वार्ताहर उठला आणि संतापाच्या भरात त्या वसुली अधिका-याची गच्ची पकडली.इतकेच नव्हे तर त्यास मारहाण सुरू केली.नांदेडच्या दरबारातील हे 'धर्म'संकट आणि 'हल्ला'गुल्ला पाहून  आवृत्ती प्रमुख उठले आणि वसुली अधिका-याला वार्ताहराच्या तावडीतून सोडविले.नंतर या वसुली अधिका-यांने सर्वासमक्ष अनावधाने बोललो म्हणून जाहीर माफी मागितली.पण चक्क बायको पाठव म्हणणा-या या वसुली अधिका-यास शेठजी आता नारळ देणार काय ?