फणसेच्या एन्ट्रीला ब्रेक लावण्याचा वागळे पंटरचा प्रयत्न

मुंबई - मंदार फणसे यांनी ऑलरेडी 'साम'ला रामराम ठोकला आहे.त्यांची आयबीएन - लोकमतचे डेप्युटी चिफ एडिटर म्हणून निवड झालेली आहे.मात्र फणसे आल्यानंतर आयबीएन - लोकमतमध्ये कसे आभाळ कोसळू शकते,हे पटवण्याचा प्रयत्न वागळे पंटरनी सुरू केलेला आहे.
अगोदरच वागळे गेल्यामुळे या पंटरवर आभाळ कोसळले आहे.त्यात फणसे येणार असल्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.कोणी 'धूप'त आहे तर कोणी कुठे 'दीक्षा' मागत आहे.हादरून गेलेली पंटर मंडळी काही दिवसांपुर्वी रिलायन्स मीडिया ग्रुपचे उपाध्यक्ष उमेश उपाध्याय यांची भेट घेतली.त्यांनी असे पटवून देण्याचा प्रयत्न केला की,फणसे हे काहीच कामाचे नाहीत.केवळ पाट्या टाकून जातात.मात्र उपाध्याय यांनी कंपनीचा निर्णय असल्याचे सांगून सर्वांना गप्प केले.त्यात 'धुप'णारी एक महिला,'दीक्षा' मागणारा एकजण,नायक बनण्याचा प्रयत्न करणारा 'विनायक' आणि कोणी 'प्रियंका' आहे म्हणे.या चौघांनी खूप पटवण्याचा प्रयत्न केला पण उपाध्याय साहेबांवर काहीच परिणाम झाला नाही.
दुसरे असे की,जेव्हा वागळे यांनी राजीनामा दिला त्यानंतर उपाध्याय यांनी ऑफीसमध्ये बैठक घेतली होती.त्याचे कोणीतरी शुटींग केले आणि त्याची क्लीप ऑफीसच्या वायफायवरून वागळेंना पाठवली.तेही ट्रेस झाले आहे.मात्र वागळेंचा पंटर असलेल्या एका चॅनल प्रोड्युसरने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे.
असो,फणसे येण्याअगोदरच आयबीएन - लोकमतमध्ये रामायण आणि महाभारत सुरू झालेले आहे.लवकरच कौरवांचा अंत होणार आहे तर सितेचे हरण होणार आहे.
इति श्री आयबीएन - लोकमत पुराण समाप्त...



जाता - जाता : 
चला जग जिंकू या' मध्ये एकाकी पडल्यामुळे 'उघडा डोळे बघा निट'मध्ये 'दीक्षा' मागणास गेलेल्यास नकार घंटा...
म्हणाले, एवढ्या पगारात तर दोन चांगले माणसे मिळू शकतात...
घर फिरले की घराचे वासे फिरू लागतात,हेच खरे....