जळगाव - कार्यालयीन शिस्तीत बाधा आणल्याप्रकरणी व आक्षेर्पाह, असभ्य वर्तन
करून ब्रांडची बदनामी केल्याच्या कारणावरून जळगावात जोर पकडत असलेल्या
'जनशक्ति'तून एकाचवेळी वेगवेगळ्या विभागातील चौघांची हकालपट्टी केली
गेल्याचे समजते. यात एका वरिष्ठ पदावरील, जबाबदार व्यक्तीचाही समावेश आहे.
दैनिकाच्या सुरुवातीच्या काळातच एका ट्रेनी महिला वार्ताहराला संस्थेला
अपेक्षित असलेली 'संहिता व बंधने' न पाळल्यामुळे तात्काळ नारळ देण्यात आला
होता. एका पत्रकार परिषदेनंतर जळगावातील इतर पत्रकारांसह रांगेत उभे राहून
'गिफ्ट' घेतल्यामुळे तेव्हा ही कारवाई केली गेली होती. अलीकडेच काही
दिवसांपूर्वी संपादकांनी मुंबई भेटीनंतर तिथल्या ब्युरोतील बहुतांश मंडळीला
नवे पर्याय शोधण्याच्या सूचना दिल्या होत्या.