पद्मश्रींच्या पुढारीमध्ये गळती सुरू

मित्रांनो,रंगिला औरंगाबादीची नविन बातमी आली आहे.त्याच्या कारभाराला कंटाळलेल्या तिघांनी सामूहिक राजीनामे देवून,मोतेवारच्या मी मराठी पेपरची वाट धरली आहे.अजूनही काहीजण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.रंगिला औरंगाबादी त्यांची मनधरणी करतोय.
आता हा रंगिला औरंगाबादी कोण आहे,हे चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यानाच माहित आहे.पद्मश्रींना मुंबईत चांगला माणूस मिळत नाही आणि रंगिला औरंगाबादीला सगळीकडे दरवाजे बंद झाले आहेत.बिचारा दर्डांच्या महाराष्ट्राच्या मानबिंदूकडे आणि पवारांच्या उदय भविष्यपत्रांकडे चकरा मारून आला,पण नो एन्ट्री म्हणून सांगण्यात आले,आता बिचारा संपादक असूनही उपसंपादकांचे काम करतोय...करू द्या बिचा-यांला..किमान उपसंपादकांचे काम काय असते,हे तर कळू द्या...रंगिला औरंगाबादीचे पुराण नंतर केव्हा तर पुन्हा सांगू आणि मूळ विषयाकडे येवू...
रंगिला औरंगाबादीच्या कारभाराला कंटाळून तिघांनी एकाचवेळी सामूहिक राजीनामे दिलेत.मुंबई ब्युरो चिफ संंजय सावंत, उपसंपादक प्रशांत येराम आणि ठाणे सिटी रिपोर्टर प्रशांत सिनकर या तिघांनी राजीनामा ठोकलाय.या तिघांना रंगिलानी खूप समजावले...नव्या दैनिकाचे काही खरे नसते,असे तो म्हणाला पण त्यांच्यावर कसलाच परिणाम नाही झाला.तिघांनी आपला निर्णय कायम ठेवून मोतेवारच्या नव्या दैनिकाची वाट धरली आहे.
अजूनही अनेकजण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे रंगिला औंरगाबादीची भंबेरी उडाली आहे.पण करतोय काय ?
आलीया भोगाशी असावे सादर...दुसरे काय ?
चला पुन्हा भेटू,नविन बातमी घेवून...तोपर्यंत बाय बाय...


टी.व्ही.9 ला खिंडार
टी.व्ही.9 मराठी या चॅनलमध्ये सध्या राजीनामासत्र सुरू आहे. ऍन्कर अमोल किन्होळकर यांनी राजीनामा देऊन ते एबीपी माझामध्ये लवकरच जॉईन होणार आहेत. तर आऊटपूटमध्ये महत्वाची जबाबदारी सांभाळणारे चंद्रकांत फुंदे यांनीही राजीनामा दिलाय..फुंदे मी मराठीच्या वाटेवर आहेत. तर येत्या आठवडाभरात आणखी दोघेजण राजीनामा देणार आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून हे राजीनामासत्र सुरू झालंय....