काकूंचा झाला घोळ...

शेतकरी व्यथा मांडताना अतीव दुःखाने ऑन कॅमेरा अश्रू ढाळणार्या बनेल निवेदिकेचा भांडाफोड बेरक्याने नुकताच केला. त्यानंतर निवेदिका काकूच्या एक- एक सुरस कथा कानावर येऊ लागल्या आहेत.
संधी आणि माणूस यांचा उपयोग कसा करून घ्यायचा हे या निवेदिका / पत्रकार काकूंकडून शिकावे.
या मॅडम कुडाळ हायस्कूलमध्ये शिकल्या. या शाळेत सायकल वरून येणारी लांब केसांची काकूबाई अशीच त्यांची ओळख होती. तिथून त्या कणकवली कॉलेजला गेल्या. त्या कणकवली कॉलेजला विद्यापीठ प्रतिनिधी होत्या. नंतर त्या सकाळमध्ये वार्ताहर म्हणून रुजू झाल्या. तिथून त्या बेळगाव तरुण भारतच्या मुंबई कार्यालयात दाखल झाल्या. तिथे सुनील तांबे, प्रकाश बाळ, महेश सरलष्कर यांच्या कंपूत त्या दाखल झाल्या. हि त्यांच्यासाठी मोठी संधी होती. नंतर मुंबई सकाळ, मिड डे असा प्रवास करत त्या काय बी एन न्‍यूज चैनलमध्ये गेल्या. तगडे गॉडफादर, इमेज मेक ओव्हर आणि पुढे पुढे करायची सवय यामुळे सुमार सुरवंटाचे अतिसुमार फुलपाखरू झाले. नेक्स्ट टू निखिल असल्यामुळे न्‍यूज चैनलमध्ये काकूंचा दरारा होता. चांगल्या हुशार पत्रकारांची गळचेपी, अवहेलना यामुळे काकुंचे विरोधक खूप होतेच. पण काकू सत्ताधारी असल्यामुळे सगळे गप्प होते. वागळे वेगळे झाले आणि काकूंची सद्दी संपली. आता तर त्या बाहेरच पडल्या आहेत. सध्यातरी दुसरीकडे कुठे संधी नाही, सुमार न्‍यूज चैनलात काम करायचे तर इमेजला सोसणारे नाही, असा काकूंचा घोळ झाला आहे.