मित्रानो,बरेच दिवस झाले,बेरक्याकडे काही अपडेटस् नाहीत.त्यामुळे बेरक्या
शांत झाला की काय,असा प्रश्न आमच्या हितचिंतकांना पडणे साहजिक आहे.बेरक्या
शांत नाही,त्याचे मराठी मीडियावर संपूर्णपणे लक्ष आहे.परंतु सध्या काही
घडतच नाही किंवा नविन काही हालचाली नाहीत,त्यामुळे आम्ही ब्लॉग किंवा
फेसबुक वॉलवर अपडेटस् देवू शकलो नाही, हे खरे आहे.
मित्रानो,बेरक्या सुरू होवून येत्या २१ मार्च रोजी चार वर्षे पुर्ण होत आहेत.आम्ही २१ मार्च रोजी पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहोत.बेरक्या कोणत्याही परिस्थितीत सुरू ठेवणे,हा आमचा प्रथम संकल्प आहे.गेल्या चार वर्षात आम्हाला अनेक संकटाचा सामना करावा लागला.पण आम्ही हरलो नाहीत किंवा पळून गेलो नाहीत.आमची जिद्द आणि चिकाटी कायम आहे.

बेरक्याविरूध्द सायबर सेलकडे अनेक तक्रारी दाखल होत्या,त्यावर आम्ही
यशस्वीरित्या मात केली.दुसरे असे की,सोर्सचे नाव कधी जाहीर केले
नाहीत.माहिती देणा-यांचे नाव गुप्त ठेवले.काही लोकांनी आमचा वापर करण्याचा
प्रयत्न केला,परंतु आम्ही कोणाच्या दावणीला बांधलो गेलो नाहीत.
बेरक्या खंबीरपणे आणि दमदारपणे अखंड चालू ठेवणे,हा संकल्प हाती घेवून आम्ही पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहोत.काही अपडेटस् दिले नाहीत म्हणून बेरक्या शांत झाला,बेरक्या बंद पडला असा ग्रह कोणी करून घेवू नये.
बेरक्या सज्जनांचा मित्र आणि दुर्जनांचा कर्दनकाळ आहे.तो कोणाच्या दावणीला कधी बांधला गेला नाही किंवा कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही.बेरक्याच्या माध्यमातून अनेकांना मदत करता आली,हेच बेरक्याचे खरे यश आहे.
आपल्या शुभेच्छा आणि सहकार्य कायम राहील,ही अपेक्षा..
पत्रकारांचा पाठीराखा
बेरक्या उर्फ नारद