'भाला' फेक करणा-या 'चंद्रया' माणसाची हकालपट्टी

पद्मश्रीच्या पेपरची औरंगाबाद आवृत्ती सुरू होणार म्हणून गेल्या पाच वर्षापासून 'डंका' सुरू आहे.मात्र आवृत्ती काही सुरू झाली नाही.मात्र औरंगाबादच्या कार्यालयात बसणा-या एका डेप्युटी न्यूज एडिटरचा चांगलाच 'डंका' वाजला आहे.
कारण अगदी क्षुल्लक आहे.या डेप्युटी न्यूज एडिटरला कसलेच काम नव्हते.एक किंवा दोन शिळ्या बातम्या पाठवायच्या व उरलेल्या वेळेत फक्त चकाट्या मारायच्या ऐवढेच काम त्यास उरले होते.कामच नसल्यामुळं पारंपारितक पुजापाठ करण्याचा आणि घंटी वाजवण्याचा धंदा तो औरंगाबादेत करत होता.
आता असा धंदा करणारा माणूस कसा असेल हे तुम्हाला कळलेच असेल.तोंडावर गोडगोड बोलायचे आणि पाठीत खंजीर खुपसायचा हा त्र्याचा हातखंडा.
.त्याचबरोबर चारचौघात मालकाची उणीदुणी काढून त्यांच्यावर 'भाला' फेक करत होता. त्याची ही सर्व काळी कर्तृत्वे पद्मश्रीपर्यंत पोहचली आणि त्यांनी कोल्हापूरच्या आखाड्यात बोलावून खूप बेकार पध्दतीने नारळ दिला.या 'चंद्रया' माणसाची पद्मश्रीच्या पेपरमधून हकालपट्टी होताच,औरंगाबादेत चर्चेचा विषय झाला आहे.
महाराष्ट्राच्या मानबिंदूतून पद्मश्रीच्या पेपरमध्ये दिवे पाजळण्यास आलेल्या या चंद्रया माणसाची कायमची घंटा वाजताच तो हवालदिल झाला आहे.हा 'भाला' फेक करणारा 'चंद्रा' माणूस भोपाळशेठच्या पेपरमध्ये हजेरी लावून आला,पण त्याची डाळ अद्याप शिजली नाही.त्यामुळे या चंद्रयावर आता पारंपारिक घंटा वाजवण्याचा धंदा करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही...